राज्यात सरकारच्या 'लाडकी बहीण’ योजनेची सध्या जोरात चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची लाडकी मुलं-मुली भाग्य आजमावण्याची शक्यता आहे. राजकारणातील घराणेशाहीची नेहमीच चर्चा होत असते. त्याला काहींचा विरोध असला तरी आपल्या वारसदारांना संधी देण्यासाठी नेते नेहमीच फिल्डिंग लावतात. त्याला यंदाची विधानसभा निवडणूकही अपवाद नसल्याचं दिसतंय. सर्वच पक्षांमधल्या नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसकडून कोण इच्छूक ?
माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत सज्ज झालाय. युवक काँग्रेसच्या कोट्यातून तिकीट मिळवण्यासाठी कुणाल यांची तयारी सुरू आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी चिमूर मतदारसंघातून संधीच्या शोधात आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार किंवा कन्या पौर्णिमा निवडणूक लढू शकतात.
दक्षिण नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल दावेदार मानले जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटमध्ये माजी राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या कन्या शीतल यांनीही तयारी सुरू केलीय.
काँग्रेसमध्ये जसे नेत्यांची मुलं इच्छुक आहेत तसे भाजपमध्येही अनेक नेत्यांची मुलं विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
भाजपकडून कोण इच्छूक ?
पुण्यात कसबा पेठ मतदारसंघात दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा
याच ठिकाणी दिवंगत माजी आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल हेही दावेदार
खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया यांना भोकरमधून उमेदवारी मिळू शकते.
जालन्यातील परतूरमध्ये माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल परतूर यांच्या नावाचीही चर्चा.
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर नव्या चेह-यांना मोठ्या संख्येनं संधी.
दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र यात नेत्यांचा मुलांचाही समावेश केला जाऊ शकतो.
राष्ट्रवादी (SP) कडून कोण इच्छूक ?
माजी मंत्री अनिल देशमुख हे दक्षिण-पश्चिम नागपुरात फडणवीस यांच्या विरोधात लढले तर त्यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून लढण्याची शक्यता आहे. आजित पवारांच्या राष्ट्रवादीत तर आमदारपुत्रांचा मोठ्या संख्येनं संधी मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी (SP) कडून कोण इच्छूक ?
बारामतीत अजित पवार यांच्या जागी पुत्र जय पवार लढणार असल्याची चर्चा.
माढामध्ये आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, पुतणे धनराज शिंदे इच्छूक आहेत.
नाशिक जिल्ह्यात दिंडोरीमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छूक
अहेरीमध्ये विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री लढण्याची शक्यता.
बीडमधील माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांच्या नावाची चर्चा.
शिंदे गटही याला अपवाद नाही. जे नेते खासदार झाले त्यांच्या मुलांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून कोण इच्छूक ?
संदीपान भुमरे हे खासदार झाल्यामुळे आता त्यांच्या पारंपरिक पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा. नेत्यांच्या लाडक्या मुलांना पक्षानं संधी दिली तरी ही मुलं जनतेचा विश्वास जिंकणार का ? हे सगळ्यात महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.