Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला; राज्यातील १२५ जागांसाठी आखली विशेष रणनीती, VIDEO

Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला आहे. राज्यातील १२५ जागांसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. भाजपच्या रणनीतीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला, राज्यातील १२५ जागांसाठी आखली विशेष रणनीती
BJPSaam tv
Published On

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसला. लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील अनेक जागा गमावल्या. त्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 'मिशन १२५' अंतर्गत भाजपने विशेष रणनीती आखली आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 'मिशन १२५' अंतर्गत आगामी निवडणुकीसाठी नव्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील ५० जागा निश्चित केल्या आहेत. या ५० जागांवर पक्षाचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असा भाजपचा दावा आहे. तसेच ७५ जागांसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला, राज्यातील १२५ जागांसाठी आखली विशेष रणनीती
BCCI Jay Shah: जय शहांनंतर कोण होणार BCCI चा सचिव? BJP च्या दिग्गज नेत्याच्या मुलाचं नाव चर्चेत!

भाजपने ७५ जागा निवडून आणण्यासाठी राज्यातील बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक बड्या नेत्यांवर विधानसभेच्या ७-८ मतदारसंघाची जबाबदारी देण्याचं नियोजन आखलं आहे. तसेच त्यांना या मतदारसंघाचा अहवाल नेतृत्वाकडे देण्यास सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील या नेत्यांनी त्या त्या मतदारसंघाचे दौरे सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपने १२५ जागा निश्चित केल्याने महायुतीतील इतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षाकडून हेवेदावे सुरु आहेत. तसेच जागावाटपाच्या चर्चेलाही सुरुवात झालेली नाही. त्या आधीच भाजपने राज्यातील काही जागा निश्चित केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला, राज्यातील १२५ जागांसाठी आखली विशेष रणनीती
BJP Candidate List: उमेदवारीवरुन भाजपमध्ये सावळा गोंधळ! आधी यादी जाहीर, नंतर स्थगिती; जम्मू- काश्मीर विधानसभेसाठी १५ नावांची घोषणा

'निवडणुकीच्या प्रचारात नवे चेहरे उतरवा'

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपकडे मोठा आग्रह ठेवला आहे. 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नवे चेहरे उतरवा, असा आग्रह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपकडे ठेवला आहे. 'सध्याचे नेते आणि इतर नेतेही विधानसभा प्रचारात उतरवा, अशा सूचना संघाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती आहे. ज्या नेत्यांवर डाग नाहीत, अशा चेहऱ्यांना प्रचारात संधी देण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com