Maharashtra Politics : पिंपरी, चिंचवड अन् भोसरी मतदारसंघाचं गणित काय? महायुती अन् मविआकडून कोणती रणनिती?

Pimpri-Chinchwad Politics : पिंपरी चिंचवड शहरातील तीन विधानसभापैकी दोन विधानसभा ह्या सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. तर एक एक विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam tv
Published On

Pimpri-Chinchwad politics : औद्योगिक नगरी कामगार नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात एके काळी अजित पवार यांची एक हाती सत्ता होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर हा अजित पवारांचा बालेकिल्ला देखील मानला जायचा. मात्र, अजित पवारांच्या (Ajit Pawar) बालेकिल्ल्यात त्यांना आता मोठ आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरी,चिंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा क्षेत्र पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात आहेत. सध्या पिंपरी विधानसभा क्षेत्रात अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत, तर चिंचवड विधानसभा क्षेत्रात भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत. आणि भोसरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे महेश लांडगे हे आमदार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील तीन विधानसभापैकी दोन विधानसभा ह्या सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. तर एक एक विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाच्या ताब्यात आहे. मात्र राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.

Maharashtra Politics
Mumbai Political News : मुंबईवर 'राज' कुणाचं? उद्धव ठाकरे की ठाकरेंचेच! ठाण्याचे शिंदे बाजी मारतील का?

पिंपरी विधानसभेसाठी दावेदार कोण ?

महायुती पिंपरी विधानसभा क्षेत्र हा सध्या अजित पवार गटा कडे आहे. या मतदार संघात विधानसभेच प्रतिनिधित्व अण्णा बनसोडे हे करत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत पिंपरी विधानसभा क्षेत्र हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे होता. त्यावेळी अण्णा बनसोडे यांनी शिव सेनेचे उमेदवार एडवकेट गौतम चाबुकस्वार यांच्या पराभव केला होता. मात्र सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पिंपरी मतदार संघावर राष्ट्रवादीचे दोन्ही गट दावा करत आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे दोन्ही गट देखील दावा करण्याची शक्यता आहे. आणि आरपीआय आठवले गटाकडून देखील महायुती पिंपरी विधानसभा क्षेत्रावर दावा करण्याची शक्यता आहे.

पिंपरी विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी

पिंपरी विधानसभेत विद्यमान आमदार अण्णा बनसोडे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुलक्षणा धर शिलवंत, देवेंद्र तायडे हे पिंपरी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्याचबरोबर सध्या भाजपात असलेल्या सीमा साळवे ह्या पण अजित पवार गटाकडे पिंपरी विधानसभेची जागा मागण्याची शक्यता आहे. महायुतीत आरपीआयला देखील या वळेस विधानसभेच्या काही जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील आरपीआय गटाकडून चंद्रकांता ताई सोनकांबळे यादेखील पिंपरी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छुक आहेत.

पिंपरी विधानसभा क्षेत्र हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, हा विधानसभा क्षेत्र जेवढा विकसित आहे. तेवढाच मागासलेला देखील आहे. या विधानसभा क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश झोपडपट्टीचा भाग आहे. हे झोपडपट्टीमध्ये राहणारे मतदार नेमकं कुणाच्या बाजूने कल देतात. त्यावर पिंपरी विधानसभेचे निकाल अवलंबून असणार आहे. त्याचबरोबर या विधानसभा क्षेत्रात प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वंचित बहुजन आघाडीचा मतदार वर्ग देखील आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मते देखील या विधानसभा क्षेत्रात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

चिंचवड विधानसभा भाजपचा बालेकिल्ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडूनकडून दावेदारी

चिंचवड विधानसभा क्षेत्र हा स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बालेकिल्ला समजला जायचा. त्यांच्या अकाली निधनानंतर चिंचवड विधानसभेत पोट निवडणूक झाली आणि त्या पोट निवडणुकीत मतदारांच्या सहानुभूतीने त्यांची पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप ह्या आमदार म्हणून निवडून आल्या. कधीकाळी चिंचवड विधानसभा क्षेत्रात लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने निवडून यायचे. मात्र त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपत प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभा क्षेत्र हा एक प्रकारे जणू भाजपचा बालेकिल्ला बनला.

मात्र 2023 च्या पोटनिवडणुकीत लक्ष्मण पांडुरंग जगताप यांची पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल होत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत देखील नाना काटे हे अजित पवार गटाकडे चिंचवड विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी जोर धरत आहेत. त्यातच दिवंगत आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे धाकटे बंधू शंकर पांडुरंग जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील आता लपून राहिली नाही. 2023 च्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याऐवजी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती.

त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून अश्विनी जगताप यांना परत विधानसभेची संधी दिली जाईल. असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर शंकर पांडुरंग जगताप यांनी देखील भाजपच्या तिकिटावर चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Politics
Jalana Election : लोकसभेत 'जरांगे फॅक्टर' भोवला, विधानसभेला महायुतीचं काय होणार? वाचा जालना जिल्ह्याचं समीकरण

चिंचवड विधानसभा क्षेत्र हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बालेकिल्ला समजला जातो. लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा क्षेत्रात अनेक नगरसेवकांना णि राजकीय पुढार्‍यांना मोठे केला आहे. मात्र आता त्यांच्याच कुटुंबीयांना भाजपकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीला विरोध होत आहे.जगताप कुटुंबीय ऐवजी भाजप ने भाजपतील इतर उमेदवारांना विधानसभा निवडणुकीसाठी संधी द्यावी अशी मागणी होत आहे. त्या मागणी मध्ये भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते शत्रुघन काटे अशा काही दिग्गज नावांचा समावेश आहे

मात्र महायुती सध्या अजित पवार यांचा पक्ष पण सहभागी असल्याने चिंचवड विधानसभा जागेवर अजित पवारांचा गट देखील दावेदारी करण्याची शक्यता आहे. 2023 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना. अतिशय कडवट आव्हान दिलं होतं. 2023 च्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे नाना काटे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले होते. त्यामुळे याही चिंचवड विधानसभा निवडणुकीत राहुल कलाटे हे महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
Dharashiv Election : महायुती की महाविकास आघाडी, धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड?

राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारीची मागणी करू शकतात. तर चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा नाना काटे यांना देखील संधी देऊ शकतो. पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटाकडे चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी खूप सारे इच्छुक उमेदवार आहेत त्यात भाऊसाहेब भोईर. माया संतोष बारणे हे इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. त्यामुळे चिंचवड विधानसभा निवडणुक यावर्षी पुन्हा एकदा चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महायुतीत चिंचवडची जागा कुणाला द्यायची यावर प्रचंड ताराबळ होणार आहे.

अजित पवारांच्या चिंचवड विधानसभा भूमिकेकडे सर्वांचे लक्ष....!

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला आहे. त्यातच अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा जागेवर त्यांना हवी तशी लीड मतदारांनी दिली नाही. त्याचबरोबर शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीत संभाव्य उमेदवार जाहीर केल्यामुळे अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढण्यासाठी फारसा रस नाही असा सूचक इशारा दिला आहे. आपल्या कार्यकर्त्यांची मागणी असल्यास जय पवार यांना बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचां सूचक इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

मात्र अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वतः च्या उमेदवारीची चाचपणी देखील सुरू केली आहे. अजित पवारांनी जर बारामती विधानसभा क्षेत्रावरील दावा सोडल्यास त्यांच्यासाठी चिंचवड विधानसभा क्षेत्र हा सर्वात सुरक्षित विधानसभा क्षेत्र असणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पुढच्या भूमिकेवर देखील चिंचवड विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीचा पेचं अवलंबून असणार आहे.

भोसरी विधानसभा क्षेत्रात ही इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ

पिंपरी चिंचवड शहरात असून देखील गावाची ओळख असलेल्या भोसरी विधानसभा क्षेत्रातून महेश लांडगे हे मागील दहा वर्षापासून विधानसभेवर प्रतिनिधित्व करत आहेत.पैलवान आणि रांगडा व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या महेश लांडगे यांनी अल्पावधीत पिंपरी चिंचवड शहरावर जबर पकड बसवली आहे. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय संबंध असल्याने त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून भोसरी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित झाल आहे.

असं असलं तरी भोसरी विधानसभा क्षेत्र हा महाविकास आघाडी सध्या शिवसेनेकडे आहे आणि अलीकडेच भाजपचे माजी नगरसेवक तसेच महेश लांडगे यांची कट्टर विरोधक रवी लांडगे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे मध्ये गटामध्ये प्रवेश केला आहे.रवी लांडगे हे देखील भोसरी विधानसभा निवडणूक शिव सेना ठाकर गटाकडून कडून लढण्याची इच्छुक आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे ह्या देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

मात्र भोसरी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची भूमिका आणि माजी आमदार विलास लांडे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या जवळपास सात आठ नगरसेवकासह तसेच काही पदाधिकार्‍यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रातून अजित गव्हाणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित गव्हाणे यांनी आतापासूनच भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी प्रचार देखील सुरू केला आहे.

मात्र महाविकास आघाडी भोसरी विधानसभा क्षेत्राची जागा नेमकं कुणाला सुटेल हे अजूनही स्पष्ट झालं नाही. त्यात भोसरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विलास लांडे हे सध्या अजित पवार गटात आहेत. आणि भोसरी विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांची अजूनही कायम आहे. विलास लांडे जरी अजित पवार गटात असले तरी ते अप्रत्यक्षपणे शरद पवार गटाला देखील पाठिंबा देत आहेत. त्यामुळे विलास लांडे हे निवडणुकीच्या तोंडावर नेमकी काय भूमिका के घेतात यावर देखील भोसरी विधानसभा क्षेत्राचे चित्र अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com