Mumbai Political News : मुंबईवर 'राज' कुणाचं? उद्धव ठाकरे की ठाकरेंचेच! ठाण्याचे शिंदे बाजी मारतील का?

Mumbai Political News : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार, मुंबईतील ३६ जागांपैकी भाजपकडे सर्वाधिक १६ आमदार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे ६ तर ठाकरेंकडे सात आमदार आहेत. काँग्रेसकडे पाच आमदार आहेत. महाविकास आघाडी की महायुती, २०२४ विधानसभा निवडणुकीत मुंबईकर कुणाला कौल देणार? याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.
Mumbai political news
Mumbai political newsSAAM TV
Published On

Maharashtra Mumbai Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार आहे. रणनीतीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या (mahayuti vs mva) बैठकावर बैठका होत आहेत. जागावाटप अन् कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायची, याबाबत सत्ताधारी आणि विरोधक विचारमंथन करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणता नेता वर्चस्व सिद्ध करणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. यात सगळ्यांची नजर असेल ती मुंबईवर!

गेली काही दशके मुंबईवर (Mumbai Political News ) ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व आहे. ते पुढेही राहील का? याचं उत्तर विधानसभेचे निकाल देतील. पण, ठाकरे-शिंदे-भाजप संघर्षात कोण बाजी मारू शकते; हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणूक झाली. त्या निकालातून मुंबईत ठाकरेंची (Mumbai uddhav thackeray News ) ताकद किती आणि भाजप-शिंदेंचा दबदबा किती, याचा अंदाज एव्हाना आलाच आहे. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची ताकद किती हेही दिसून आलं. मराठीसोबतच हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे झुकलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Raj thackeray MNS) पाठिशी किती मतदार आहे, हेही आगामी निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळे मुंबईचा 'किंग' कोण असेल, यासाठी मुंबईसह उपनगरांतील विधानसभेच्या जागांचे गणित समजून घेऊयात.

Mumbai political news
Aamdar Yadi: आमदारकीच्या निवडणुका कधी? महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी एका क्लिकवर!

उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय ? मुंबईवर पुन्हा वर्चस्व राखणार का?

लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही राहील. मुंबईतील 36 पैकी अधिकाधिक जागा आपल्याकडे राहाव्यात, यासाठी उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे ३६ पैकी २५ जागांसाठी आग्रही आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ...तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड मिळाला. अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरेंकडून नव्या चेहऱ्यांना संधी -

वांद्रे पूर्व मधून वरून सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता, शिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल, असे समजतेय.

Mumbai political news
Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

काँग्रेस ताकद वाढवण्यासाठी मैदानात उतरणार

मुंबईमध्ये काँग्रेसचे सध्या ५ आमदार आहेत. एक खासदार आहे. आगामी विधानसभेसाठी काँग्रेस ताकदीने मैदानात उतरेल.काँग्रेस मुंबईत १३ ते १५ जागा लढवण्याच्या तयारीत अशल्याचे समोर आलेय. ऐकाकाळी मुंबईमध्ये काँग्रेसची मोठी ताकद होती, आता पुन्हा एकदा मुंबईत आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मुंबई काँग्रेसचा प्रयत्न असेल.

लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर आता विधानसभेत काँग्रेस अधिकच्या जागा मागण्याची शक्यता आहे. मुंबईत वर्षा गायकवाड, अमिन पटेल, झिशान सिद्दीकी आणि अस्लम शेख असे महत्वाचे ४ काँग्रेसचे आमदार होते. यंदा कुलाबा, मुंबा देवी, भायखळा, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, बांद्रा, बांद्रा पूर्व, चांदीवली, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, मालाड पश्चिम आणि जोगेश्वरीसह काही जागा काँग्रेस मागण्याची शक्यता आहे. मविआमधील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील मुंबईतील ताकद पाहता काँग्रेसला किती जागा मिळणार, हे पाहण महत्वाचं आहे.

राष्ट्रवादी किती जागांवर लढणार ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील यावेळी मुंबईत ८ ते ९ जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागांवर दावा करणार? याबाबत उस्तुकता लागली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईमध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लोकसभेप्रमाणेच ताकदीने लढण्याची शक्यता आहे.

मनसेचा फटका कुणाला बसणार, मनसे मुंबईत खातं उघडणार का?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठं यश मिळालं होतं. पण २०१४ आणि २०१९ मध्ये मनसेच्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, त्याचा फटका निकालात दिसला. आता दहा वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेने स्थानिक पातळीवर भर दिला असून पक्षसंघटना बळकट केली आहे. त्यामुळेच मनसेनं विधानसभेत उतरवण्याचं प्लॅनिंग केलेय. बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करत मनसेने पहिला डाव टाकलाय. मनसेकडून मुंबईतील मतदारसंघात चाचपणी करण्यात आली आहे. मुंबईत राज ठाकरे कोणत्या मतदारसंघात उतरणार, त्याचा फटका कुणाला बसणार? याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

लोकसभेला राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत लढणार का? आशा चर्चा सुरु झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलाय. पण गेल्या 18 वर्षांच्या पक्षाच्या कारकिर्दीत 2009 सालची निवडणूक सोडली तर पक्षाला आलेल्या अपयशानंतर आणि भूमिकांमध्येही सातत्य दिसून आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेचं पुनर्वसन होणार की पुन्हा निराशाच पदरी पडणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

मनसेचा कोअर मतदार हा शिवसेनेचा मतदार आहे. यामुळे मराठी मतं प्रामुख्याने विभागली जाऊ शकतात. मनसेच्या उमदेवाराचा सर्वात जास्त फटका शिवसेना (ठाकरे) आणि ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे. मुंबईतील काही मतदारसंघात मनसेचे उमेदवार १० ते २० हजारांची मते खाऊ शकतात, याचा फटका ठाकरेंना बसण्याची शक्यता आहे. मविआ आणि महायुतीत थेट निवडणूक होणार असल्याने यात मनसेला किती फायदा होईल, किंवा मनसेचे किती आमदार निवडून येतात, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

भाजप पुन्हा वर्चस्वासाठी प्रयत्नशील, किती जागांवर निवडणुका लढणार ?

सध्या आमदारांची संख्या पाहिली तर मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. मुंबईमध्ये भाजपचे १६ आमदार आहेत. आगामी निवडणुकीतही भाजप जास्तीत जास्त जागा लढण्याची शक्यता आहे. मुंबईतील भाजपचा मतदार हा ठरलेला आहे, पण राज ठाकरे मैदानात उतरल्यामुळे त्यांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षभरापासून मुंबईमध्ये भाजप तयारी करत आहे. आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत मतदारांना आकर्षित करण्यात येतेय. विधानसभा निवडणुकीचा निकालावर आगामी बीएमसी निवडणुकीची रुपरेषा ठरणार आहे. बीएमसीवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपचं मुंबईवर विशेष लक्ष आहे. मुंबईमध्ये भाजप २५ च्या आसपास जागांवर निवडणुका लढवण्याची शक्यता आहे.

Mumbai political news
Aamdar Yadi: आमदारकीच्या निवडणुका कधी? महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी एका क्लिकवर!

मुंबईतील आमदार कुणाकडे किती ? (Mumbai MLA List)

भाजपचे आमदार - १६

बोरीवली विधानसभा - सुनिल राणे (भाजप)

दहिसर विधानसभा - मनिषा चौधरी (भाजप)

मुलुंड विधानसभा - मिहीर कोटेचा (भाजप)

कांदिवली पूर्व विधानसभा - अतुल भातखळकर (भाजप)

चारकोप विधानसभा - योगेश सागर (भाजप)

गोरेगाव विधानसभा - विद्या ठाकूर (भाजप)

वर्सोवा विधानसभा - भारती लवेकर (भाजप)

अंधेरी पश्चिम विधानसभा - अमित साटम (भाजप)

विलेपार्ले विधानसभा - पराग अळवणी (भाजप)

घाटकोपर पश्चिम विधानसभा - राम कदम (भाजप)

घाटकोपर पूर्व विधानसभा - पराग शाह (भाजप)

वांद्रे पश्चिम विधानसभा - आशिष शेलार (भाजप)

सायन कोळीवाडा विधानसभा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)

वडाळा विधानसभा - कालिदास कोळंबकर (भाजप)

मलबार हिल विधानसभा - मंगल प्रभात लोढा (भाजप)

कुलाबा विधानसभा - राहुल नार्वेकर (भाजप)

शिवसेना (शिंदे) - ६

मागाठणे विधानसभा - प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

जोगेश्वरी पूर्व विधानसभा - रवींद्र वायकर, सध्या लोकसभेवर (शिवसेना - एकनाथ शिंदे)

चांदिवली विधानसभा - दिलीप लांडे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

कुर्ला विधानसभा - मंगेश कुडाळकर (शिवसेना- एकनाथ शिंदे)

माहिम विधानसभा - सदा सरवणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)

भायखळा विधानसभा - यामिनी जाधव (शिवसेना - एकनाथ शिंदे)

शिवसेना (ठाकरे) ७

विक्रोळी विधानसभा - सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)

दिंडोशी विधानसभा - सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)

अंधेरी पूर्व विधानसभा - ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)

चेंबुर विधानसभा - प्रकाश फातर्पेकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)

कलिना विधानसभा - संजय पोतनीस (शिवसेना - उद्धव ठाकरे)

वरळी विधानसभा - आदित्य ठाकरे (शिवसेना - उद्धव ठाकरे)

शिवडी विधानसभा - अजय चौधरी (शिवसेना - उद्धव ठाकरे)

काँग्रेस - ५

भांडुप पश्चिम विधानसभा - सुरेश कोपरकर (काँग्रेस)

मालाड पश्चिम विधानसभा - अस्लम शेख (काँग्रेस)

वांद्रे पूर्व विधानसभा - झिशान सिद्दीकी (काँग्रेस)

धारावी विधानसभा - वर्षा गायकवाड (काँग्रेस) - सध्या लोकसभेवर निवड

मुंबादेवी विधानसभा - अमीन पटेल (काँग्रेस)

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा - अबू आझमी (समाजवादी पक्ष)

अणूशक्तिनगर विधानसभा - नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com