Dharashiv Election : महायुती की महाविकास आघाडी, धाराशिवमध्ये कोणाचं पारडं जड?

Dharashiv Election : धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २ तर ठाकरे गटाचा १ आमदार व ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत तर भाजपाचा केवळ राणा जगजितसिंह पाटील हे एकमेव आमदार आहेत.
Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024
Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024
Published On

बालाजी सुरवसे, साम टिव्ही, धाराशिव

Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024 : धाराशिव जिल्ह्यात एकूण ४ विधानसभा मतदार संघ आहेत, यामध्ये तुळजापूर, धाराशिव-कळंब,उमरगा-लोहारा व भुम-परंडा-वाशी या मतदार संघाचा समावेश आहे. यामध्ये धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा ठाकरे गटाच्या ताब्यात असून कैलास पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत तर भुम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत हे येथील विद्यमान आमदार आहेत तर तुळजापूर हा भाजपाच्या ताब्यात असुन माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील हे या विधानसभेच प्रतिनिधित्व करतात. उमरगा-लोहारा या मतदार संघातून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे विद्यमान आमदार आहेत. धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २ तर ठाकरे गटाचा १ आमदार व ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत तर भाजपाचा केवळ राणा जगजितसिंह पाटील हे एकमेव आमदार आहेत.

Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024
Mumbai Political News : मुंबईवर 'राज' कुणाचं? उद्धव ठाकरे की ठाकरेंचेच! ठाण्याचे शिंदे बाजी मारतील का?

धाराशिव- कळंब विधानसभा

धाराशिव -कळंब विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर ठाकरे गटाचा झेंडा आहे. उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत आमदार कैलास पाटील हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. २०२४ साठी कैलास पाटील विरुध्द महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सुधीर पाटील, नितीन लांडगे,सुरज साळुंखे हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडुन डॉ.प्रतापसिंह पाटील,संजय पाटील दुधगावकर हे इच्छुक आहेत. तर या मतदारसंघातून भाजपाकडून देखील इच्छुकांची मोठी संख्या आहे. अजित पिंगळे,दत्ता कुलकर्णी, नितीन काळे हे भाजपकडून इच्छुक आहेत.

भुम-परंडा-वाशी विधानसभा

भुम-परंडा-वाशी हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ आहे. मविआ कडून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे हे इच्छुक आहेत.

Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024
Jalana Election : लोकसभेत 'जरांगे फॅक्टर' भोवला, विधानसभेला महायुतीचं काय होणार? वाचा जालना जिल्ह्याचं समीकरण

तुळजापूर - विधानसभा

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करता. भाजपला टक्कर देण्यासाठी मविआकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. तुळजापूर मतदारसंघातून मविआकडून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रतिक रोचकरी तर शरद पवार गटाकडून सक्षणा सलगर,अ शोक जगदाळे इच्छुक आहेत. काँग्रेसनेही तयारी केली असून या जागेवर दावा ठोकला आहे. काँग्रेसकडून माजी आमदार मधुकर चव्हाण, धिरज पाटील हे देखील इच्छुक आहेत तर यामध्ये देवानंद रोचकरी देखील इच्छूक असुन ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे.

उमरगा - लोहारा विधानसभा

उमरगा लोहारा हा आरक्षित मतदार संघ आहे. हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाकडे आहे. सध्या ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून पूर्ण ताकद पणाला लावली जात आहे. मविआकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रा.संजय कांबळे,सातलिंग स्वामी हे इच्छुक आहेत.

Dharashiv (Osmanabad) Vidhan Sabha Election 2024
Kalyan Dombivli : ३ महायुती, १ मनसे, चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय झुंबड, महायुती अन् मविआचा कस लागणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com