Jaisalmer AC Bus Fire Saam Tv
देश विदेश

AC Bus Fire: दिवाळीसाठी गावाकडे निघाले, वाटेत बसने पेट घेतला; जवानासह ५ जणांचं कुटुंब जिवंत जळाले

Jaisalmer Bus Fire: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एसी बसला लागलेल्या आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जवानासह त्याचे ५ जणांचे कुटुंब देखील जिवंत जळाले. दिवाळीसाठी जवान आपल्या कुटुंबासोबत गावी जात असताना ही घटना घडली.

Priya More

Summary -

  • राजस्थानच्या जैसलमेरजवळ मंगळवारी एसी बसला भीषण आग लागली

  • या दुर्घटनेत आतापर्यंत २१ प्रवाशांचा मृत्यू झाला

  • लष्कराचे जवान महेंद्र मेघवाल आणि त्यांचे कुटुंब या आगीत जिवंत जळाले

  • दिवाळीनिमित्त मेघवाल कुटुंबीय गावाकडे जात असताना ही घटना घडली

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण आग लागली होती. या घटनेमध्ये आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये लष्कराचे जवान महेंद्र मेघवाल यांचा देखील समावेश आहे. ते दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबीयांसोबत घरी जात होते. या दुर्घटनेत फक्त जवानाचा मृत्यू नाही झाला तर त्यांची पत्नी आणि ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचही जण जिवंत जळाले. या घटनेमुळे मेघवाल कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महेंद्र मेघवाल हे बायको पार्वती, दोन मुली आणि एका मुलासोबत गावी जात होते. ते जोधपूर जिल्ह्यातील सेतवारा क्षेत्रामध्ये असणाऱ्या लवारन गावातील रहिवासी होते. ते जैसलमेरमधील दारू गोळा डेपोमध्ये कार्यरत होते आणि इंदिरा कॉलनीमध्ये कुटुंबीयांसोबत भाड्याने राहत होते. मंगळवारी ते पत्नी आणि मुलांसोबत जोधपूरला जात होते. पण कुणालाच माहिती नव्हते की कुटुंबासोबतचा हा प्रवास त्यांचा अखेरचा ठरेल.

थैयत गावाजवळ अचानक ते प्रवास करत असलेल्या बसला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. एसी बस असल्यामुळे आणि दरवाजे लॉक झाल्यामुळे कुणालाच बाहेर पडता आले नाही. बसमधील अनेक प्रवासी या आगीमध्ये जिवंत जळाले. यामध्ये जवानाच्या ५ जणांच्या कुटुंबातील सर्वजणांचा मृत्यू झाला. डीएनएन सॅम्पलद्वारे जवानाच्या कुटुंबीयांची ओळख पटवण्यात आली आहे.

जैसलमेर ते जोधपूरदरम्यान ही बस धावते. ज्या बसला आग लागली त्यामधून प्रवास करणाऱ्या २१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दिवाळीपूर्वीच अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या घटनेचा तपास सध्या सुरू आहे. ज्वलनशील पदार्थामुळे ही आग लागल्याचा प्रथामिक अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?

Maharashtra Live News Update: कोपरगावात अवकाळी पावसाची हजेरी

हेल्मेटच्या विविध रंगामध्ये लपलंय खास सिक्रेट; वाचा कोणत्या रंगाचा काय अर्थ?

Moon: जगात सर्वप्रथम चंद्र कुठे दिसतो?

संग्राम जगताप म्हणाले हिरव्या सापाला ठेचण्याची वेळ आली, अजित पवारांनी काढले वाभाडे, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT