AC Bus Fire : धावत्या एसी बसला अचानक आग, अग्नितांडवात २० जणांचा होपळून मृत्यू, 16 जण गंभीर

Jaisalmer AC Bus Fire News : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये मंगळवारी सायंकाळी धावत्या एसी बसला आग लागली. यामध्ये २० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलेय.
Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update
Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news updateGoogle
Published On

Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये धावत्या एसी बसमध्ये अग्नितांडव झाले. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १६ जण गंभीर भाजले आहेत. ही दुर्दैवी घटना खासगी एसी स्लीपरमध्ये घडली. वाऱ्याचे वेगाने बस जात होती, त्यावेळी अचनक एसी बसला आग लागली. त्यामध्ये अनेकजण प्रवास करत होते. आग लागल्यानंतरही काही काळ बस धावतच होती. बर्निंग बसचा थरार अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. बसमध्ये आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. लोकांच्या किंकळ्या अन् आरडाओरड यामुळे बसमध्ये भयानक परिस्थिती झाली होती. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलेय. मृताच्या नातेवाईकांन आणि जखमींना सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे. (20 dead in Jaisalmer AC sleeper bus fire latest update News )

मंगळवारी सायंकाळी धावत्या एसी स्लीपर बसला अचानक आग लागली. या दुर्घनेची माहिती मिळताच अग्निशामन दल अन् बचाव पथकासह पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवले, पण तोपर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत १६ जण गंभीररित्या भाजले गेले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतामध्ये महिला अन् लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. जखमींची परिस्थिती पाहता मृताची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update
Maharashtra politics : अजित पवारांचा शिंदेंना धक्का, नवी मुंबईतील अनेकांच्या हातात घड्याळ

धावत्या एसीबी स्लीपर बसला आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण प्राथमिक तपासानुसार, एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका (Reason behind AC bus catching fire in Rajasthan) उडाला आहे. एसी बसला आग लागल्यानंतरही काही किमीपर्यंत बस धावतच होती अन् आतमध्ये प्रवासी जिव वाचवण्यासाठी जोर जोरात ओरडत होते. काही जणांनी खिडकीमधून उडी मारून आपला जीव वाचवला. ही आग इतकी भीषण होती की बस जळून खाक झाली. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देशात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर काही वर्षापूर्वी नाशिकमध्ये धावत्या बसला लागलेल्या आगीच्या घटनेच्या कटू अटवणीही जाग्या झाल्या.

Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update
बॉयफ्रेंडसोबत मध्यरात्री भांडण, महिलेने विहिरीत उडी मारली, तिघांचा मृत्यू, नेमकं झालं काय?

एसी बसला भयानक आग लागल्याचे समजताच वैद्यकीय पथकाही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. या दुर्दैवी घटनेत गंभीर जळालेल्या १६ जणांना तात्काळ जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर रूग्णांना तात्काळ जोधपूरला रेफर करण्यात आले. जखमी रुग्णांमध्ये महिपाल सिंग, ओमाराम, युनूस, मनोज भाटिया, इक्बाल, फिरोज, भागा बाई, पीर मोहम्मद, जीवराज, हुसेन, इमामत, विशाखा, आशिष, रफिक, लक्ष्मण आणि उबेदुल्ला यांचा समावेश आहे. माहितीनुसार, बहुतेक जखमी ५० ते ७० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले आहेत.

Rajasthan Jaisalmer AC bus fire latest news update
IND vs WI 2nd Test : गौतमला दिवाळीचं गिफ्ट! विंडीजचा २-० ने सुपडा साफ, प्रिन्सच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com