IND vs WI 2nd Test : गौतमला दिवाळीचं गिफ्ट! विंडीजचा २-० ने सुपडा साफ, प्रिन्सच्या नेतृत्वात पहिला मालिका विजय

Shubman Gill leads India to first Test series win as captain : दिल्ली कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेटने पराभव करत मालिका २-० ने जिंकली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला कसोटी मालिका विजय आहे. कोच गौतम गंभीर यांना दिवाळीचं गिफ्ट मिळालं आहे.
Ind vs Wi
Ind vs Wisaam tv
Published On

India vs West Indies 2nd Test Delhi full match report : शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदाच कसोटी मालिका खिशात घातली आहे. दिवाळीच्या आधी टीम इंडियाने क्रिकेट चाहत्यांना विजयाची भेट दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताने विडिंजचा सात विकेटने पराभव करत मालिका २-० ने खिशात घातली आहे. दिल्ली कसोटी जिंकण्यासाठी भारताला १२१ धावांचे लक्ष मिळाले होते. भारताने हे आव्हान तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. (Gautam Gambhir gets perfect Diwali gift as India beat West Indies 2-0)

दिल्ली कसोटी जिंकून प्रिन्सच्या शिलेदारांनी कोच गौतम गंभीरला मोठं गिफ्ट दिलेय. दिल्ली कसोटीमध्ये भारताने पहिल्या डावात ५१८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात फक्त २४८ धावांपर्यंतच मजल मारली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे विंडिजची फलंदाजी ढेपाळली. भारताने विडिंजला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजीला आमंत्रित केले होते. पण दुसऱ्या डावात विंडिजच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करत ३९० धावांपर्यंत मजल मारली. भारताला विजयासाठी विडिंजने माफक १२१ धावांचे आव्हान दिले होते. सलामी फलंदाज केएल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने हे आव्हान सहज पार केले.

Ind vs Wi
मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, नेमका काय घेतला निर्णय?

यशस्वी-गिलची शानदार शतके

अरुण जेटली स्टेडियममध्ये कर्णधार शुभमन गिल आणि सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल यांनी शतके ठोकले. यशस्वीने कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतकी तडका लावला होता. तर साई सुदर्शन ८७ धावा काढून बाद झाला. त्याने यशस्वीसोबत १९३ धावांची भागिदारी रचली. दुसऱ्या दिवशी यशस्वीचे द्विशतक थोडक्यात हुकले. १७५ धावांवर असताना यशस्वी धावबाद झाला. यशस्वीने २२ चौकारांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. यशस्वी बाद झाल्यानंतर गिलने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. गिलने शानदार शतकी खेळी केली. भारताने पहिल्या डाव ५ बाद ५१८ वर घोषित केले. केएल राहुल (३८), नितीश कुमार रेड्डी ( 43) आणि ध्रुव जुरेल (44) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

Ind vs Wi
IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

कुलदीपच्या फिरकीत विडिंज अडकले

कुलदीप यादवच्या फिरकी गोलंदाजीत विडिंजचा संघ अडकला. विडिंजचा पहिला डाव फक्त २४८ धावांत संपुष्टात आला. कुलदीपने विडिंजच्या आघाडीच्या फंलजाला माघारी धाडले. कुलदीपने एलिक एथनाज, शाय होप, तेविन इमलाच, जस्टिन ग्रीव्स आणि जयडेन सील्स यांना तंबूत धाडले. त्याशिवाय कुलदीप यादवने विडिंजच्या तीन फलंदाजांची शिकार केली. मोहम्मद सिराज अन् जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

Ind vs Wi
Accident : इंजिनियरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, भिवंडीत भयंकर अपघात, आई-वडिलांचा आक्रोश

भारताचा फॉलोअन -

भारताच्या भेदक माऱ्यापुढे विडिंजला फॉलोऑन रोखता आला नाही. त्यामुळे पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरावे लागेल. पण दुसऱ्या डावात त्यांनी शानदार कामगिरी केली. जॉन कँपबेल आणि शाय होप यांनी १७७ धावांची भागिदारी करत विडिंजचा स्कोर ३९० पर्यंत पोहचवला. दोघांनीही शतकी खेळी केली.

Ind vs Wi
अकोल्यात वंचित अन् ठाकरे सेनेला जोरदार धक्का, आरक्षण सोडतीमुळे दिग्गजांची कोंडी अन् पक्षाला फटका

भारताचा शानदार विजय -

कँपबेल आणि होप यांच्या शतकी खेळीच्या बळावर विडिंजने भारतापुढे १२१ धावांचे माफक आव्हान दिले. भारताने पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. केएल राहुल याने शानदार अर्धशतक ठोकत विजय मिळवून दिला. कसोटी क्रिकेटच्या इथिहासात भारताने फक्त चौथ्यांदा विरोधी संघाला फॉलोअन देत फलंदाजीला उतरलाय. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मिळालेला हा विजय भारतीय संघाचे नक्कीच मनोबल वाढवणारा असेल.

Ind vs Wi
Shocking : संघाला जिंकून देऊन आयुष्याची लढाई हरला, अखेरचा चेंडू टाकताच गोलंदाजाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com