मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट, नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra government simplifies document registration process : आता मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी करता येणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षेत्रीय मर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.
mumbai stamp office
mumbai stamp officeSaam Tv
Published On

Mumbai revenue department removes stamp office jurisdiction limit : मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार आहे. क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचेल. निर्णय प्रक्रिया व कार्यालयीन कामकाज जलद होईल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा लाखो मुंबईकरांना फायदा होणार आहे. (Now register documents in any Mumbai stamp office)

मुंबई व मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी (Adjudication of Document ) करू शकतील. ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली.

mumbai stamp office
Accident : इंजिनियरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, भिवंडीत भयंकर अपघात, आई-वडिलांचा आक्रोश

आता मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल.

mumbai stamp office
दिवाळीआधी लाडकीला सरकारचे आणखी एक गिफ्ट, e-KYC च्या मुदतवाढीवर मोठी घोषणा, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

सिंधुदुर्गासाठी महत्त्वाचा निर्णय -

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाड्या आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदली झाली. या रस्त्याना महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नवी नावे दिली आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी निर्णय घेतला. या निर्णयामुळे "हरिजन वाडी", "चर्मकार वाडी", "बौद्ध वाडी" अशी जातीवाचक नावे इतिहासजमा होऊन सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com