Accident : इंजिनियरचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू, भिवंडीत भयंकर अपघात, आई-वडिलांचा आक्रोश

Fatal road accident kills 29-year-old engineer in Maharashtra : भिवंडीमध्ये झालेल्या भीषण अपघातात २९ वर्षीय इंजिनिअर विनोद पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Fatal road accident kills 29-year-old engineer in Maharashtra
Fatal road accident kills 29-year-old engineer in MaharashtraSaam TV Marathi News
Published On

फय्याज शेख, साम टीव्ही प्रतिनिधी

Young engineer crushed to death under truck in Bhiwandi : भिवंडीमध्ये सोमवारी रात्री उशिरा भयानक अपघात झालाय. कामावरून घरी जाणाऱ्या एका इंजिनिअर तरूणाच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिली. त्यामध्ये त्या तरूणाचा जागेवरच मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येतेय. मृत तरूणीचे नाव विनोद पाटील असे असून तो फक्त २९ वर्षांचा होता. भिवंडीमध्ये चाविंद्रा-वडपे मार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घेतली. या घटनेने कशेळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.

भिवंडीतील चाविंद्रा-वडपे मार्गावर सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुण इंजिनियरचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात निंबवली नाका परिसरात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातातील मृत तरुणाची ओळख विनोद पाटील (वय 29, रा. कशेळी) अशी झाली आहे. विनोद पाटील हा वाशिंद येथील एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. दररोजप्रमाणे काम आटोपून घरी परत येत होता, त्यावेळीच काळाने घाला घातला.

Fatal road accident kills 29-year-old engineer in Maharashtra
दिवाळीआधी लाडकीला सरकारचे आणखी एक गिफ्ट, e-KYC च्या मुदतवाढीवर मोठी घोषणा, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?

विनोद पाटील घरी परत येत होता, त्यावेळी ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर दुचाकीचा तोल गेला अन् ती ट्रकखाली आली. या भीषण अपघातामध्ये विनोद पाटील ट्रकखाली चिरडला अन् जागीच ठार झाला. या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. भिवंडी तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने कशेळी व परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताचा सविस्तर तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.

Fatal road accident kills 29-year-old engineer in Maharashtra
एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com