
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Akola ZP reservation list details : अकोला जिल्हा परिषदेच्या राजकारणातील दिग्गजांना आरक्षण सोडती:मध्ये आज फटका बसलाय.. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि माजी उपसभापतींचे सर्कल राखीव झाल्याने मोठा धक्का बसलाय. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देखील आरक्षण सोडतीचा धक्का बसलाय.. जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांचा दहीहंडा सर्कल हा SC महिलांसाठी राखीव झाला. तर भाजपचे गटनेत्या मायाताई कावरे यांचा शेलू बाजार सर्कल देखील SC महिला राखीव झाला आहे..
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांचा शिर्ला सर्कल देखील 'एसी राखीव' झाला आहे.. वंचितचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने यांचा बाभूळगाव सर्कलं राखीव SCसाठी राखीव आहे.. तर माजी सभापती रिझवाना परवीन'चा माना सर्कल हा सर्वसाधारण महिलासाठी राखीव झालाय.. वंचितच्या झेपडीच्या माजी अध्यक्षा संगीता आढाव आणि माजी सभापती आम्रपाली खंडारे आणि आकाश शिरसाठ यांना आरक्षण सोडतीमध्ये दिलासा मिळाला आहे.. .
दरम्यान, नुकतेच शिंदे शिवसेनामध्ये आलेले माजी उपसभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा चांदुर सर्कल हा सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने काहीसा दिलासा मिळाला..
अकोला जिल्हा परिषदेच्या राजकारणातील या दिग्गजांना फटका आणि दिलासा...
शिवसेना ठाकरे गट.
1) गोपाल दातकर : दहीहंडा सर्कल : SC महिला राखीव. (फटका)
भाजप :
मायाताई कावरे (गटनेते) : शेलू बाजार : SC महिला राखीव. (फटका)
वंचित बहुजन आघाडी
1) संगीता आढाव, माजी अध्यक्षा : तळेगाव बु. सर्कल : सर्वसाधारण (दिलासा)
2 ) माजी उपाध्यक्ष सुनिल फाटकर : शिर्ला सर्कल : SC राखीव. (फटका)
3) ज्ञानेश्वर सुलताने : बाभूळगाव : SC राखीव. (फटका)
4) माजी सभापती, आम्रपाली खंडारे : पारस सर्कल: सर्वसाधारण. (दिलासा)
5) माजी सभापती, रिझवाना परवीन : माना सर्कल : सर्वसाधारण महिला राखीव.(दिलासा)
6) आकाश शिरसाठ, माजी सभापती : उगवा : SC राखीव. (दिलासा)
7) राम गव्हाणकर : देगाव सर्कल : SC राखीव. (फटका)
शिंदे शिवसेना :
1) माजी उपसभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी : चांदुर : सर्वसाधारण.(दिलासा)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.