Shocking : संघाला जिंकून देऊन आयुष्याची लढाई हरला, अखेरचा चेंडू टाकताच गोलंदाजाचा मृत्यू

Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ball : उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये क्रिकेट सामन्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. शेवटचा चेंडू टाकून संघाला विजय मिळवून देणारा गोलंदाज अहमर खान मैदानावरच कोसळला आणि काही क्षणांत त्याचा मृत्यू झाला.
Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ball
Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ballSaam TV Marathi
Published On

Ahmar Khan bowler death in Moradabad match : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटच्या मैदानावरच खेळाडूचा मृत्यू झाला आहे. गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू टाकल्यानंतर खेळाडूचा मृत्यू झाला आहे. आपल्या संघाला विजय मिळवून दिला, पण आयुष्याच्या लढाईत खेळाडू हारला. उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये ही दु:खद घटना घडली आहे. शेवटचा चेंडू टाकताना गोलंदाजाचा मृत्यू झालाय. (Local cricket player heart attack on field UP)

मुरादाबादमध्ये बिलारी ब्लॉकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका क्रिकेट सामन्यावेळी सुन्न करणारी घटना घडली आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीवरच गोलंदाचाने प्राण सोडले. यूपी वेटरन्स क्रिकेट एसोसिएशनकडून आयोजित करण्यात स्पर्धेत ही धक्कादायक घटना घडली. मुरादाबाद आणि संभल या दोन संघामध्ये आमना सामना सुरू होता. यावेळी दुर्दैवी घटना घडली.

Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ball
Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

मुरादाबाद संघाने प्रथम फलंदाजी करत माफक आव्हान दिले होते. संभल संघाकडून आव्हानाचा पाठलाग करण्यात येत होता. अखेरच्या चार चेंडूवर संभल संघाला १४ धावांची गरज होती. मुरादाबादकडून अहमर खान हा गोलंदाजी करत होता. डावखुऱ्या अहमर खान याने भेदक मारा करत संभलच्या फलंदाजाला रोखलं अन् सामना जिंकून दिला. पण शेवटचा चेंडू टाकताना त्याचा मृत्यू झाला.

Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ball
Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

अखेरचा चेंडू टाकताच झाला मृत्यू

डावखुऱ्या अहमर खान याने सामन्याचा शेवटचा चेंडू टाकताच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तो मैदानात बसला अन् त्यानंतर खेळपट्टीवरच पडला. सहकाऱ्यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. सीपीआर दिले. थोडावेळासाठी त्याला शुद्ध आली. त्याला रूग्णालयात दाखल केले. पण उपचाराआधीच अहमर खान याने प्राण सोडले होते. अहमर खान याला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मैदानावर अन् उत्तरप्रदेशमध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

Uttar Pradesh cricket bowler dies after delivering last ball
Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com