Jagmohan Singh Raju resigns from BJP Punjab Vice President post, triggering political reactions. saam tv
देश विदेश

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; पक्षात मोठी खळबळ

Jagmohan Singh Raju Steps Down From BJP Post: पंजाब भाजपचे उपाध्यक्ष डॉ. जगमोहन सिंह राजू यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

पंजाबमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला असून माजी आयएस अधिकारी आणि भाजप नेते डॉ. जगमोहन सिंह राजू यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांनी पत्र लिहून आपल्याला कुठलीही जबाबदारी देऊ नये अशी विनंती त्यांनी केली. पंजाबमधील काही महत्वाच्या विषयांना मला संपूर्ण वेळ द्यायचा आहे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

जगमोहन सिंह राजू यांनी 5 जून रोजी भाजपचे महासचिव मंत्री श्री निवासुलू यांना लिहिले. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या चार वर्षात पंजाब भाजपचे उपाध्यक्ष आणि महासचिव म्हणून काम हे उत्तमरीत्या पार पाडले.

प्रदेशाध्यक्ष पदावरून होती नाराजी

काही दिवसांपूर्वीच भाजपने केवल सिंग ढिल्लन यांची पंजाब भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीनंतर जगमोहन राजू यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी डॉक्टर जगमोहन सिंग राजू यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि पक्षाने केवल सिंग ढिल्लन यांचे नाव जाहीर केले.

पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पंजाबशी संबंधित असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर मला गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. अमृतसरला पवित्र शहर म्हणून घोषित करण्याची मागणी असो, तरुणांना शैक्षणिक मदत देणे असो, किंवा विविध समुदायांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे असो, या सर्व मुद्द्यांवर मला सक्रियपणे काम करायचे आहे. पुढे ते म्हणाले हे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ लागेल. त्यामुळे, मी पक्षाला विनंती केली आहे की, काही काळांसाठी अशा कोणत्याही संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे. मात्र आतापर्यंत कोणत्याही वरिष्ठ भाजप नेत्यांनी पत्रावर प्रतिसाद दिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT