माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; खासदाराने दिला सर्व पदांचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Mamata Banerjee Setback Kakoli Ghosh Resigns Tmc: तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळली असून खासदार काकोली घोष यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
TMC MP Kakoli Ghosh announces resignation from all party posts, dealing a blow to Mamata Banerjee amid rising internal dissent.
TMC MP Kakoli Ghosh announces resignation from all party posts, dealing a blow to Mamata Banerjee amid rising internal dissent.saam tv
Published On

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा पराभवाचा भाजपकडून दणका बसल्यानंतरही माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या राजकीय अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. बुधवारी त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला, त्यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आणि टीएमसीच्या खासदार काकोली घोष यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली. काकोली घोष यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

TMC MP Kakoli Ghosh announces resignation from all party posts, dealing a blow to Mamata Banerjee amid rising internal dissent.
Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना फ्लाइटचा मागील भाग धावपट्टीला धडकला

काकोली घोष या गेल्या अनेक दशकांपासून टीएमसीसोबत जोडलेल्या असून पक्षातील वरिष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्या सुमारे ९-१० महिने लोकसभेत पक्षाच्या चीफ व्हिप पदावर होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना या पदावरून हटवून त्यांच्या जागी कल्याण बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे घोष नाराज झाल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिले होते, 1976 पासून नातं, 1984 मध्ये प्रवास सुरू झाला. आज चार दशकांच्या निष्ठेचे असे फळ मिळाले.

TMC MP Kakoli Ghosh announces resignation from all party posts, dealing a blow to Mamata Banerjee amid rising internal dissent.
Pawan Khera House Raid : काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या घरावर छापेमारी; विधानसभा निवडणुकीआधी मोठी कारवाई; हैदराबादला पळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. दरम्यान, केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करून ‘Y’ श्रेणी दिली, तर निवडणूक पराभवानंतर अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मंगळवारी काकोली घोष या सहा आमदारांसह कल्याणी येथे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या प्रशासकीय आढावा बैठकीला उपस्थित राहिल्या होत्या. बारासातच्या खासदार असलेल्या काकोली घोष यांच्यासोबत या बैठकीला देगंगा मतदारसंघाचे आमदार अनीसुर रहमान बिस्वास, स्वरूपनगरच्या बीना मंडल, हारोआचे मोहम्मद अब्दुल मतीन तसेच बसीरहाट परिसरातील आणखी तीन आमदार उपस्थित होते. याआधी दोन दिवसांपूर्वीच काकोली यांनी टीएमसीच्या बारासात संघटनात्मक जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी आयपॅकवर (I-PAC) देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

TMC MP Kakoli Ghosh announces resignation from all party posts, dealing a blow to Mamata Banerjee amid rising internal dissent.
तीन दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार; राज्याचा थेट मुख्यमंत्रीच बदलणार?

दरम्यान, भाजप खासदार सौमित्र खान यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की टीएमसीमध्ये मोठी नाराजी असून सुमारे ५० आमदार आणि २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी म्हटले जर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकदा होकार दिला, तर टीएमसी पक्ष उरणार नाही. अनेक नेते पक्षात येण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com