

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोर.
सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांच्यात सत्तासंघर्ष.
30 मे रोजी नवीन मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीवरून रणकंदन माजले असताना शेजारील राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री बदलाची चर्चांना राज्यात रान उठवलंय. हो, बरोबर आम्ही बोलत आहेत, कर्नाटकमधील राज्य सरकारमधील उलाढालविषयी. कर्नाटक राजकारणात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
राज्य सरकारमध्ये नेतृत्व बदला बद्दलच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवसात म्हणजेच 30 मे रोजी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील सत्तासंघर्षाच्या बातम्या राजकीय वर्तुळात पसरल्या.
आता हा सत्तासंघर्ष एका नव्या आणि निर्णायक वळणावर पोहोचला आहे. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा वाढली असून त्यांनी वेळोवेळी बंडाचे संकेत देखील दिले. तर त्यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांनी तर स्वत:हून दिल्ली गाठत हायकमांडची भेट घेतली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे सीएमच्या खुर्चीवरून उठण्यास नतर नाहीत.
शेवटी काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या वादात थेट दिल्लीच्या हायकमांडला मध्यस्थी करावी लागली. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं. दिल्लीत झालेल्या बैठकीत डी.के शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा आहे. वृत्तानुसार, नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा ३० मे रोजी होण्याची शक्यता आहे.
मात्र, या राजकीय रस्सीखेचीत अखेरीस कोणत्या नावाला मंजुरी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सूत्रांनुसार, डी. के. शिवकुमार यांचा राज्याभिषेक निश्चित मानला जात आहे. मात्र, या राजकीय रस्सीखेचीत अखेर कोणत्या नावाला मंजुरी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडसोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकांनंतर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कर्नाटकच्या राजकारणातून काढून केंद्रीय राजकारणात पाठवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. पक्षाचे हायकमांड त्यांना राज्यसभेत पाठवून एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी सोपवण्याचा विचार करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.