

जालंधर आणि अमृतसरमध्ये दोन स्फोट
बीएसएफ मुख्यालय आणि लष्करी तळाजवळ घटना
पंजाबमध्ये हायअलर्ट जारी
पंजाबमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या स्फोटामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. जालंधरमधील BSF मुख्यालयाबाहेर आणि अमृतसरजवळील खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळ स्फोट झाला. मंगळवारी काही तासांच्या फरकाने दोन ठिकणी घडल्या असल्याने पोलिसांनी हायअलर्ट जारी केला आहे. दरम्यान स्फोट घडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि लष्करी जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी सखोल तपास सुरू केला आहे. तर राज्यभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पहिला स्फोट हा जालंधरमधील BSF मुख्यालयाजवळ झाला. जेथे नागरिकांची वर्दळ असते, त्याठिकाणी पार्क केलेल्या स्कूटरमध्ये स्फोट झाला. स्फोट होताच स्कूटरला आग लागली. स्फोटाचा आवाज ऐकताच नागरिकांची पळापळ झाली. आपला जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी सैरवैर पळू लागले, अशी माहिती काही लोकांनी दिली.
याप्रकरणी जालंधर पोलीस आयुक्त धनप्रीत कौर म्हणल्या की, प्राथमिकदृष्ट्या पार्क केलेल्या स्कूटरला आग लागली असली तरीही सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. स्कूटरचा मालक २२ वर्षीय गुरप्रीत सिंग किरकोळ जखमी झालाय.
दुसरी घटना मंगळवार रात्री १०. ५० वाजता अमृतसरजवळील खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळ जोरदार स्फोट झाला. हा परिसर अटारी वाघा सीमेपासून अवघ्या १५ किमी अंतरावर आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ग्रेनेड फेकला असावा अशी शक्यता वर्तवली जातेय. अमृतसरचे एसपी आदित्य एस. वॉरियर यांनी सांगितलं की, घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी बॉम्ब निकामी पथकासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेची पथके आली आहेत. किती स्फोट झाले आणि त्याचे नेमके कारण काय होते, याची माहिती घेतली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.