टार्गेटचा ताण असह्य झाला, कर्मचार्‍यांची सटकली; बॉसला दारू पार्टीत बोलावून क्रूरपणे संपवलं

shocking news : टार्गेटचा ताण असह्य झाल्याने कर्मचार्‍यांची सटकली. त्यानंतर दोघांनी दारू पार्टीत बोलावून क्रूरपणे संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Uttar pradesh shocking  news
Uttar pradesh shocking Saam tv
Published On
Summary

कामातील टार्गेटचा त्रास असह्य झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बॉस संपवल्याची घडली घटना

दोन कर्मचाऱ्यांनी सेल्स मॅनेजरची केली हत्या

सेल्स मॅनेजरच्या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ

कामाचा ताण, टार्गेटचा त्रास आणि बॉसकडून झालेल्या कथित छळाने वैतागलेल्या कर्मचाऱ्याने हादरवणारं कृत्य केलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील दोन कर्मचाऱ्यांनी सेल्स मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोनू जायस्वाल (३०) असे हत्या झालेल्या सेल्स मॅनेजरचे नाव आहे. सेल्स मॅनेजरच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू जायस्वाल हे २६ एप्रिल रोजी सायंकाळी घरातून निघाले. त्यानंतर बेपत्ता झाले. एका दिवसाने त्यांचा मृतदेह उन्नावच्या गंगाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रस्त्यावर आढळला.

पोलीस अधिकारी सत्यजीत गुप्ता यांनी सांगितलं की, 'मोनू हे मृत्यूच्या काही तास आधी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी बापन पाल याच्यासोबत होते. याच बापन पालला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बापन हा पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाइल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला. पोलिसांच्या चौकशीत बापनने सहकारी अतीत वर्माचंही नाव घेतलं'.

Uttar pradesh shocking  news
Shocking : गर्लफ्रेंडला भेटायला बॉयफ्रेंड हॉटेलवर गेला; दोघांचा वाद झाला, मॅनेजरचा जीव गेला, नेमकं काय घडलं?

दोघांनी आरोप केला की, मोनू जायस्वाल कथित छळ करून टार्गेट पूर्ण करून घेत होते. ते स्वत: जास्त इन्सेटिव्ह घ्यायचे. तर टार्गेट पूर्ण न झाल्यावर शिवीगाळ करायचे'. कथित छळाला कंटाळून दोघांनी एका महिन्याआधी बॉसच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी एक निर्जन स्थळ देखील निश्चित केले होते.

दारू पार्टीचा केला बहाणा

दोघांनी दारू पार्टी करूयात म्हणत दोघांनी बॉसला आमिष दिलं. दारू पार्टीसाठी निर्जनस्थळी नेलं. त्यानंतर मोनूच्या डोळ्यात स्प्रे मारला. यामुळे मोनू असह्य झाला. त्यानंतर मॅनेजरची हत्या केली. हत्या केल्यानंतरही बापनने संशयाच्या सुईच्या वर्तुळातून बाहेर राहण्याचा प्रयत्न केला. बापन मॅनेजरच्या कुटुंबीयाच्या संपर्कात होता. मॅनेजर घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली

Uttar pradesh shocking  news
Shocking : नामंकित हॉटेलवर पोलिसांची रेड, रूमचा दरवाजा उघडताच तरुण- तरुणी नको त्या अवस्थेत सापडले

पोलिसांनी दोघांना केली अटक

पोलिसांच्या तपासात दोन्ही कर्मचाऱ्यांवर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अटक करून तुरुंगात पाठवलं. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्या, हत्येचा कट रचणे आणि पुरावे मिटवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील कारवाई देखील सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com