Accident x
देश विदेश

Accident : इटलीमध्ये भीषण अपघात! ट्रक आणि कारची जोरदार धडक, ४ भारतीयांचा मृत्यू

Accident News : इटलीमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. इटलीमधील माटेरा येथे अपघात झाला. ट्रक आणि कार यांच्या धडकेमध्ये चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.

Yash Shirke

  • इटलीच्या माटेरा शहरात अपघात

  • ट्रक आणि कार यांच्यात धडक

  • चार भारतीय नागरिकांचा मृत्यू

Italy Accident : इटलीच्या माटेरा शहरामध्ये भीषण अपघात घडला आहे. ट्रक आणि कारच्या धडकेमध्ये ४ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इटलीची राजधानी असलेल्या रोममधील भारतीय दूतावासाने या दुर्घटनेची माहिती दिली. मृतांमध्ये सहा जणांचा समावेश आहे. घटनेदरम्यान चार भारतीय नागरिक जागीच ठार झाले, तर सहाजण गंभीररित्या जखमी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, माटेराच्या स्कॅन्झानो जोनिको परिसरात हा अपघात झाला. १० जणांना घेऊन जाणाऱ्या सात आसनी कारची एका ट्रकला धडक झाली. कारमधील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील सहापैकी चारजण हे भारतीय होते. इतर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांची ओळख कुमार मनोज (३४ वर्षे), सिंग सुरजीत (३३ वर्षे), सिंग हरविंदर (३१ वर्षे) आणि सिंग जसकरण (२० वर्षे) अशी आहे. रोममधील भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. दक्षिण इटलीतील माटेरा येथे झालेल्या अपघातात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर भारतीय दूतावास तीव्र शोक व्यक्त करत आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

आम्ही तपशील मिळवण्यासाठी स्थानिक इटालियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. संबंधित कुटुंबांना भारतीय दूतवास शक्य तितक्या प्रकारे मदत करेल, असेही दूतावासाच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. एएनएसएने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी पाच जणांना माटेरातील पोलिकोरो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वात जास्त जखमी असलेल्या नागरिकावर सॅन कार्लो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT