गौतमी पाटील कारवाईच्या कचाट्यातून 'निसटली'! १०० पेक्षा जास्त CCTV चेक केले, शेवटी पोलिसांना नेमका क्लू मिळाला

Gautami Patil Car Accident : पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी गौतमी पाटीलला क्लीन चिट दिली आहे. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील देखील तिच्या वाहनात होती असा आरोप केला जात होता.
Gautami Patil
Gautami Patilx
Published On
Summary
  • अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, तपासातून अंतिम माहिती समोर

  • गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून 'क्लीन चिट' मिळाली.

  • पुणे पोलिसांनी तपासले तब्बल १०० पेक्षा अधिक CCTV फुटेज

Gautami Patil Car Accident Case : अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. गौतमी पाटीलच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाला होता. अपघाताच्या वेळेस गौतमी सुद्धा वाहनात होती असा आरोप करण्यात आला. अपघातावेळी गौतमी ही वाहनात नव्हती अशी अंतिम माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून गौतमी पाटीलला क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर अपघातावेळी फक्त गौतमी पाटीलचा चालक वाहनात उपस्थित होता हे स्पष्ट झाले.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताला गौतमी नाही फक्त तिच्या वाहनाचा चालक जबाबदार आहे. अपघाताच्या वेळी ती वाहनात नव्हती. पोलिसांनी अपघात स्थळापासून भोरपर्यंतचे शेकडो सीसीटीव्ही तपासले. अपघातावेळी तिच्या वाहनात फक्त चालत उपस्थित होता असे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Gautami Patil
Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमीच्या चालकाने अपघात केला. त्याने एका रिक्षाला धडक दिली. पण तेव्हा वाहनामध्ये गौतमी पाटील नव्हती अशी माहिती संभाजी कदम यांनी दिली आहे. अपघातानंतर पुणे ते भोर या रस्त्यावरील ४० ते ५० ठिकाणांहून १०० हून अधिक सी सी टिव्ही फुटेज तपासले गेले. आत्तापर्यंत झालेल्या तपासातून गौतमी पाटीलचा या अपघाताशी संबंध नसल्याचे तपासातून समोर आले आहे.

Gautami Patil
Kalyan : कल्याणकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून सुटका; कल्याणमधील सर्वात मोठा उड्डाणपूल सुरु होणार

अपघातापूर्वी वाहनातून २ व्यक्ती खाली उतरल्या आहेत पण त्यांचा कुठला ही संबंध अपघाताशी नसल्याचे सुद्धा पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर तांत्रिक बाबी आणि इन्शुरन्स यासाठी गौतमी पाटील यांचे स्टेटमेंट घेऊ, पण आत्तापर्यंत झालेल्या तपासातून गौतमी पाटीलचा संबंध नसल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी दिली आहे.

Gautami Patil
Shocking : अजबच! मुलाच्या नाकाच्या आत आले दात... डॉक्टरांनी सांगितलं यामागचं नेमकं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com