Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

Bernard Julien : माजी वेस्ट इंडियन क्रिकेटपटू बर्नार्ड ज्युलियन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. ज्युलियन यांच्या निधनामुळे क्रिकेट जगतात शोक व्यक्त केला जात आहे.
Bernard Julien Death
Bernard Julien Deathx
Published On
Summary
  • माजी वेस्ट इंडियन क्रिकेटपटू बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन.

  • वयाच्या ७५ व्या वर्षी त्रिनिनादमध्ये घेतला अखेरचा श्वास.

  • १९७५ च्या विश्वचषकात त्यांनी अमूल्य योगदान दिले होते.

Bernard Julien Death : क्रिकेट विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि १९७५ वर्ल्डकप विजेते बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्रिनिदादमधील वॉल्सॉल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वेस्ट इंडियन क्रिकेटमधील ते महान खेळाडू होते. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

१९७५ च्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजकडून खेळाताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांनी ग्रुप स्टेजच्या सामन्यात श्रीलंकेच्या विरुद्ध चार गडी बाद केले होते. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धही चार विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना त्यांनी फलंदाजीद्वारे योगदान दिले होते. ते वेस्ट इंडियन संघासाठी महत्त्वाचे खेळाडू होते.

Bernard Julien Death
IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, खुन्नस दिली; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

बर्नार्ड ज्युलियन यांनी वेस्ट इंडिजसाठी एकूण २४ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ७६६ धावा केल्या. सोबतच त्यांनी ५० बळी देखील घेतले. त्यांनी १२ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही सहभाग घेतला होता. त्यात ज्युलियन यांनी ८६ धावा केल्या होत्या आणि १८ विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची समृद्ध अशी कारकीर्द होती. अनेक वेस्ट इंडियन खेळाडूंना त्यांनी प्रेरणा दिली होती.

Bernard Julien Death
IND Vs PAK : टीम इंडियाची मोठी फसवणूक, मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवलं; नेमकं काय घडलं? VIDEO

बर्नार्ड ज्युलियन यांच्या निधनावर क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष किशोर शैलो यांनीही ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्युलियन यांच्या निधनाच्या बातमीवर त्यांनी दु:ख व्यक्त करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात त्यांनी वेस्ट इंडियन क्रिकेट बोर्डाकडून बर्नार्ड ज्युलियन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Bernard Julien Death
IND Vs PAK सामना 'या' हल्ल्यामुळे थांबला, स्टेडियम धुराने भरले; पाहा नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com