
भारत-पाकिस्तान महिला वर्ल्डकप सामना कीटकांच्या हल्ल्यामुळे थांबवावा लागला.
खेळाडूंना त्रास झाल्याने मैदानात स्प्रे आणि धूर फवारण्यात आला.
काही वेळानंतर सामना पुन्हा सुरु झाला आणि भारताने २४७ धावा केल्या.
ICC Women's World Cup 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सध्या कोलंबोमध्ये रंगला आहे. या सामन्यादरम्यान एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना हा सामना थांबवण्यात आला होता. कीटकांनी केलेल्या हल्ल्यामुळे खेळाडूंना खेळादरम्यान त्रास व्हायला सुरुवात झाली. यामुळे सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. कीटकांना पळवण्यासाठी मैदानात स्प्रेचाही वापर करण्यात आला.
पाकिस्तानच्या कर्णधाराने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार टीम इंडियाचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. सामन्याला रंगत येत असताना कीटकांना, डासांनी हल्ला केला. खेळाडूंच्या डोक्यावरुन, डोक्यासमोरुन हजारो कीटक उडत होते. सुरुवातीला सामना २-३ मिनिटांसाठी थांबवावा लागला. क्षेत्ररक्षण करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंनी कीटकांवर फवारणी करून त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्नही केला.
यानंतर काही काळाने सामना सुरु झाला. पण कीटकांचा त्रास पुन्हा सुरु झाला. त्यानंतर पंचांनी ३४ व्या ओव्हरनंतर सामना पुन्हा थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी, भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना मैदान सोडावे लागले आणि मैदानावर लगेच मशीनमधून धूर सोडण्यात आला. संपूर्ण १५ मिनिटे सामना थांबला होता. त्यानंतर कीटकांचा त्रास पुन्हा झाला नाही.
भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हर्समध्ये २४७ धावा केल्या. हरलीन देओलने सर्वाधिक ४६ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर १९ धावा आणि स्मृती मनधाना २३ धावा करुन माघारी परतल्या. रिचा घोष, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज यांनीही धावसंख्येत योगदान दिले. भारतीय फलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.