IND Vs PAK मध्ये राडा! डोळे वटारुन पाहिले, खुन्नस दिली; भारताची कर्णधार पाकिस्तानी खेळाडूला भिडली

IND Vs Pak Women's World Cup : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुरु आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
IND Vs Pak Women's World Cup 2025
IND Vs Pak Women's World Cup 2025x
Published On
Summary
  • भारत-पाकिस्तान संघ महिला वर्ल्डकपमध्ये आमनेसामने

  • सामन्यातील एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

  • भारताची कर्णधार पाकिस्तानी गोलंदाजाला भिडली

IND Vs Pak Women's World Cup Viral Video : श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान हा महिला वनडे वर्ल्डकप २०२५ मधील सामना रंगला आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २४७ धावांवर सर्वबाद झाला. आता पाकिस्तानच्या महिला संघाला जिंकण्यासाठी २४८ धावा कराव्या लागणार आहे. सामन्यात भारताची फलंदाजी सुरु असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्यामध्ये ज्या वेळेस भारतीय संघाने १०० धावा पूर्ण झाल्या, त्यावेळेस ही घटना घडली. २२ व्या ओव्हरमध्ये पाकिस्तान गोलंदाज नशरा संधू गोलंदाजी करत होती. त्यावेळेस हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल फलंदाजी करत होत्या. त्या ओव्हरमध्ये हरमनप्रीत कौरने दोन चौकासांह ११ धावा काढल्या होत्या. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूच्या वेळेस दोघींनी एकमेकींकडे रागाने पाहिले.

IND Vs Pak Women's World Cup 2025
भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

शेवटच्या चेंडूवर हरमनप्रीत कौरने समोरच्या दिशेने फटका मारला. तेव्हा नशरा संधूने चेंडू हातात घेत हरमनप्रीतच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिने हरमनप्रीतकडे डोळे वटारुन पाहिले. त्याला उत्तर देताना हरमनप्रीत कौरनेही नशराकडे रागाने पाहिले. कौर नशराकडे पाहून काहीतरी बोलली. तिचे बोलणे स्टम्प माईकमध्ये कैद झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

महिला वर्ल्डकप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान घडलेल्या अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. टॉसच्या वेळी हरमनप्रीत कौरने पाकिस्तानच्या कर्णधार फातिमा सनाशी हस्तांदोलन करणे टाळले. त्यादरम्यान मॅच रेफरीने भारतीय संघाची फसवणूकदेखील केली. पाकिस्तानच्या कर्णधाराने टेल्स म्हटले असताना हेड्सचा कॉल देऊन मॅच रेफरीने पाकिस्तानला टॉस जिंकवून दिला.

IND Vs Pak Women's World Cup 2025
IND Vs PAK : टीम इंडियाची मोठी फसवणूक, मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवलं; नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com