
इराणी कप २०२५ मध्ये विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया आमनेसामने
सामन्याच्या शेवटच्या दिवशी दोन खेळाडूंमध्ये जोरदार राडा
पंच, खेळाडूंच्या मध्यस्थीमुळे मोठा अनर्थ टळला
Video : विदर्भाच्या संघाने ९३ धावांनी रेस्ट ऑफ इंडिया या संघाचा पराभव करत इराणी कप २०२५ जिंकला. या विजयासह विदर्भाने तिसरा इराणी कप आहे. यापूर्वी संघाने २०१८ आणि २०१९ मध्ये इराणी कपची स्पर्धा जिंकत ट्रॉफी मिळवली होती. इराणी कपमध्ये रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाशी रेस्ट ऑफ इंडियाशी लढत असते. शेवटचा इराणी कप हा मुंबईच्या संघाने जिंकला होता.
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी (५ ऑक्टोबर) मैदानात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यश धुल्ल आणि यश ठाकूर या दोन खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. जर पंच आणि खेळाडूंनी यात हस्तक्षेप केला नसता, तर दोन्ही खेळाडूंमध्ये हाणामारी झाली असती. रेस्ट ऑफ इंडियाच्या दुसऱ्या डावात ६३ व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
६३ व्या ओव्हरमध्ये विदर्भाता वेगवान गोलंदाज यश ठाकूरने पहिला चेंडू थोडा शॉर्ट टाकला. त्यावर यश धुल्लने अप्पर कट मारण्याचा प्रयत्न केला. पण फटका योग्य वेळी मारण्यात तो अयशस्वी ठरला. अथर्व तायडेने सोपा झेल घेत यश धुल्लला बाद केले. विकेट मिळाल्यानंतर यश ठाकूरने आक्रमकपणे आनंद साजरा केला.
९२ धावा काढणारा यश धुल्ल आधीपासूनच आक्रमक मूडमध्ये होता. त्याने यश ठाकूरच्या सेलिब्रेशनवर नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये गरमागरमी झाली आणि वातावरण तापले. यादरम्यान पंचानी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. त्यांनी दोन्ही खेळाडूंना वेगळे केले. विदर्भाच्या खेळाडूंनीही मध्यस्थी केली. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.