Pune Crime : रागाने पाहिलं म्हणून तरुणाची हत्या, कोयत्याने केले सपासप वार; पुण्यात भयंकर घडलं

Pune News : पुण्यातील दापोडी येथे एका तरुणावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला. पाठीवर, डोक्यावर वार झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Crime
Crimex
Published On
Summary
  • पुण्यातील दापोडी येथे तरुणाची हत्या

  • रागाने पाहिले म्हणून कोयत्याने वार

  • पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

Pune : पुण्यातून मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रागाने पाहिल्याने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. कोयत्याने सपासप वार करत आरोपींनी तरुणाला संपवले. आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते असेही म्हटले जात आहे. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवडच्या दापोडी येथील जय भवानी मित्र मंडळासमोरच्या रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास हत्येची घटना घडली. मृत तरुणाचे नाव शेखर भालेराव (वय २४ वर्षे) असे आहे. तरुणाच्या वडिलांनी या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गौरव गायकवाड आणि अजय खरात यांना अटक केली.

Crime
Pune Crime : बदला तो फिक्स... म्हणत आंदेकर टोळीच्या समर्थनात बनवले रिल्स, पोलिसांच्या नजरेस पडताच करेक्ट कार्यक्रम

सुमारे दोन वर्षांपूर्वी संशयित गौरव आणि अजय यांच्यासोबत मृतक शेखरचे भांडण झाले होते. त्यांच्यामध्ये किरकोळ गोष्टींवरुन वाद होत असे. ८ दिवसांपूर्वी रागाने बघितल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला होता. यामुळे गौरव, अजय आणि त्यांच्या साथीदारांनी शेखरची हत्या केल्याचे म्हटले जात आहे. आरोपींनी बेसावध शेखरच्या डोक्यावर आणि पाठीवर कोयत्याने वार केले.

Crime
Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का, बड्या नेत्याने भाजपचे 'कमळ' हाती घेतले

जीवघेणा हल्ला झाल्यानंतर शेखरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेखरच्या वडिलांनी गौरव, अजय यांच्यासह आणखी तिघांवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी अजय आणि गौरव यांना घटना घडल्यानंतर लगेच अटक करुन न्यायालयात हजर केले. दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Crime
IND Vs PAK : टीम इंडियाची मोठी फसवणूक, मॅच रेफरीने पाकिस्तानला जिंकवलं; नेमकं काय घडलं? VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com