
चार वर्षाच्या मुलाच्या नाकात आले दात
तपासानंतर असह्य वेदनांचे कारण समोर
एम्सच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन काढला दात
Tooth Growing Inside His Nose : एम्स गोरखपूर येथे एका ४ वर्षांच्या मुलाच्या नाकात वाढलेला दात डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला आणि मुलाला वेदनांपासून आराम मिळाला. सहा महिन्यांपासून मुलाला नाकात आणि जबड्यात असह्य वेदना सहन कराव्या लागल्या होत्या. या वेदना का होत आहेत याचे कारण अस्पष्ट होते. एम्स गोरखपूरमधील डॉक्टरांनी तपासणी केली. मुलाच्या नाकात दात वाढला आहे असे त्यांना आढळून आले. डॉक्टरांनी नाकातून दात काढल्याने मुलाला जीवनदान मिळाले आहे.
मुलाला मागील सहा महिन्यांपासून मुलाला त्याच्या नाकाजवळ आणि वरच्या जबड्याजवळ तीव्र वेदना होत असे. नाकातून पाणी वाहत असे, तर कधी नाक सुजत असे. मुलाच्या कुटुंबियांनी अनेक ठिकाणी उपचार करुन पाहिले पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी मुलाला एम्स गोरखपूर येथे नेण्यात आले. तेथील दंतचिकित्सा आणि मॅक्सिलोफेशियल सर्जनचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शैलेश कुमार यांनी मुलाची तपासणी केली. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना वेदनेमागील कारण समजले. मुलाच्या नाकात एक पूर्ण दात होता, त्यासोबत एक सिस्ट तयार झाली होती.
नाकाच्या आत वाढणारा दात हा एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. सामान्यत: दात हे जबड्यात किंवा हिरड्यांमध्ये विकसित होता. पण या प्रकरणात दात अनुनासिक पोकळीच्या आत विकसित होतात. यामुळे श्वास घेताना आणि बोलताना त्रास होतो. हा प्रकार अत्यंत गुंतागुतीचा होता. जर दात त्वरीत काढला नसता, तर सायनस संसर्ग आणि गंभीर श्वसनाच्या समस्या उद्भवू शकल्या असत्या असे डॉ. शैलेश कुमार यांनी स्पष्ट केले. ही केस एम्स गोरखपूरचे संचालक डॉ. विभा दत्ता यांना कळवण्यात आली. त्यांनी ताबडतोब खास टीम तयार करुन शस्त्रक्रियेची तयारी केली. सुमारे दीड तास चाललेल्या शस्त्रक्रियेदम्यान, डॉक्टरांनी मुलाच्या नाकाच्या आतील दात आणि सिस्ट दोन्ही काळजीपूर्वक काढून टाकले. त्यानंतर मुलाला विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.
मुलाला सुमारे एका वर्षापूर्वी चेहऱ्यावर दुखापत झाली होती. दुखापतीदरम्यान दाताचे जंतू स्थान बदलून नाकाच्या पोकळीत विकसित होऊ लागले. त्यामुळे हा प्रकार घडला असावा. जर त्यावेळीच योग्य तपासणी केली असती, तर परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती, असे डॉ. शैलेश यांनी सांगितले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुलाच्या आईवडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले. ४८ तासांच्या निरीक्षणानंतर मुलाला सामान्य वॉर्डमध्ये हलवले. हळूहळू त्याचा त्रास पूर्णपणे कमी झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.