ISRO successfully launches INSAT-3DS Saam Tv
देश विदेश

ISRO ने लॉन्च केले INSAT-3DS उपग्रह, हवामानाची मिळणार अचूक माहिती; होणार हे फायदे

INSAT-3DS : भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (Indian Space Research Organization) आज INSAT-3DS उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केलं आहे.

Satish Kengar

ISRO successfully launches INSAT-3DS:

भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (Indian Space Research Organization) आज INSAT-3DS उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केलं आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारताला हवामानाची अचूक माहिती गोळा करणे सोपे होणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 (GSLV-F14) वर लॉन्च करण्यात आले. या उपग्रहाचे वजन 2,274 किलो आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या उपग्रहाचे मिशन लाइफ 10 वर्षे आहे. म्हणजेच हा उपग्रह पुढील दहा वर्षे हवामान बदलांची माहिती देत ​​राहील. या उपग्रहावर सुमारे 500 कोटी रुपये खर्च झाले आहेत. (Latest Marathi News)

एकदा वर्किंग मोडमध्ये आल्यावर, ते वादळ तसेच जंगलातील आग, हिमवर्षाव, धूर आणि बदलते वातावरण याबद्दल माहिती देईल. या उपग्रहाचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आणि महासागर निरीक्षणांच्या अभ्यासाला चालना देणे हा आहे.

दरम्यान, याचे प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आली होती. रॉकेटने उड्डाण करताच लोकांनी टाळ्या वाजवत जल्लोष साजरा केला. इस्रोने सांगितले की, 2,274 किलो वजनाचा उपग्रह भारतीय हवामान विभागसह (IMD) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांना सेवा देईल. 1 जानेवारी रोजी PSLV-C58/Exposet मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर 2024 मध्ये ISRO ची ही दुसरी मोहीम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून पाणी विसर्ग वाढवला

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT