Israel-Hamas War Saam Tv
देश विदेश

Israel-Hamas War: इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दरम्यान इस्त्रायलने दक्षिण गाझामधील रफाह शहरावर हवाई हल्ले केले आहे. यात १३ जण ठार झाले आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे.

इस्त्रायलच्या बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोक रफाह शहरामध्ये आश्रय घेत आहेत. परंतु आता इस्त्रायलने रफाह शहरावरच हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या नेत्यांमध्ये युद्धासंबंधित संभाव्या चर्चा होण्याची शक्यता होती. त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला आहे.

इस्त्रायल आणि हमासचे युद्ध खूप जास्त टोकाला पोहचले आहे. इस्त्रायलने हमासला हरवण्यासाठी लष्करी कारवाई केली होती. यात जवळपास ३४,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे २३ लाख लोकांना विस्थापित केले आहे.

हमासच्या अधिकाऱ्यांनी या युद्धाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, खलील अल- हया यांच्या नेतृत्वाखाली हमासचे अधिकारी युद्ध संपवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करतील. या चर्चेसाठी कतार आणि इजिप्त मध्यस्थी भूमिका बजावत आहे.

इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून युद्ध सुरु आहे. हमासने इस्त्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट टाकले होते. त्यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली होती. इस्त्रायल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायने हमासवर प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला केला. त्यात गाझामध्ये तब्बल ३४ हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. यात ७० टक्के महिला आणि लहांन मुलांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT