Hamas-Israel: हमास नेता इस्माइल हानियाच्या ३ मुलांचा ड्रोन हल्ल्यात मृत्यू, इस्रायलवर आरोप

Hamas Leader Ismail Haniyeh : हानिया यांनी दोहा येथील रुग्णालयात हलवण्यात आलेल्या जखमी पॅलेस्टिनींची भेट घेतली. त्यावेळी हानिया यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची बातमी दिली.
Hamas-Israel
Hamas Leader Ismail Haniyeh ANI

Hamas Leader Ismail Haniyeh 3 Sons Died In Israeli Airstrike :

इस्रायलने बदलापोटी आपल्या ३ मुलांची हत्या केल्याचा आरोप हमासचे सर्वोच्च नेते इस्माइल हानिया यांनी केलाय. हजेम, अमीर आणि मोहम्मद असं हानिया यांच्या मुलांची नावे आहेत. हानिया यांनी अल-जझीरा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दिलीय. जेरुसलेम आणि अल-अक्सा मशीद मुक्त करण्याच्या मार्गावर चालत असताना तिची मुले शहीद झालीत, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलंय. (Latest News)

माझ्या मुलांना सूडबुद्धीने आणि कोणतेही नियम किंवा मानवी हक्क न पाळता मारण्यात आले. त्यांच्या मृत्यूमुळे हमासच्या कारवायांवर आणि मनोधैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सांगून हमास पूर्वीप्रमाणेच आपल्या उद्दिष्टांसाठी लढत राहील, असं हानिया यांनी मुलाखतीत सांगितलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान इस्माइल हानिया हे गाझापासून दूर असलेल्या कतारमध्ये राहतात. तेथून ते हमाससाठी कार्य करतात. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायलकडून पलटवार करण्यात येत आहे. तेव्हापासून हानिया हे कतार येथे राहत आहेत. हानिया यांनी दोहा येथील रुग्णालयात हलवण्यात आलेल्या जखमी पॅलेस्टिनींची भेट घेतली. त्यावेळी हानिया यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची बातमी दिल्याचं हमासच्या अल-अक्सा टीव्ही वाहिनीने वृत्त दिलंय.

अल-अक्सा टीव्हीच्या वृत्तानुसार, गाझा शहरातील शाती निर्वासित छावणीजवळ हजेम, अमीर आणि मोहम्मद हानिया त्यांच्या कुटुंबीयांसह मारले गेले. हे सर्व भाऊ कुटुंबीयांसह एका कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी इस्रायली ड्रोनने त्यांच्या वाहनाला लक्ष्य केले. या हल्ल्यात सर्व भाऊ आणि कुटुंबातील इतर सहा जण ठार झालेत.

याप्रकरणात बोलताना इस्रायलचे युद्ध कॅबिनेट मंत्री बेनी गँट्झ यांनी दावा केला की, हमासचा लष्करी पराभव झालाय, परंतु इस्रायल पुढील अनेक वर्षे त्याविरूद्ध लढेल, असेही ते म्हणाले. हमासच्या बंडखोरांचा खात्मा झालाय किंवा ते लपून बसले आहेत. हमासची शक्ती कमी झाल्याचा दावाही गँट्झ यांनी केलाय.

Hamas-Israel
Lebanon Attack on Israel: हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला; एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com