Benjamin Netanyahu : इस्रायलच्या विजयाचा मार्ग राफातून जाईल; PM नेत्यानाहू यांच्याकडून हल्ल्याची तारीख निश्चित

Pm Benjamin Netanyahu statement : 'इस्रायलच्या विजयासाठी फक्त गाझा नाही, तर राफावर देखील हल्ला करणे गरजेचे आहे, असा संदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.
Pm Benjamin Netanyahu
Pm Benjamin Netanyahusaam tv

benjamin netanyahu :

दक्षिण गाझा शहरातून सैन्य माघारी बोलावणे आणि ईदच्या पार्श्वभूमीवर काही दिवस शांतता असेल, या वृत्तादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी धक्कादायक वक्तव्य करत जगाला आश्चर्यचकीत केलं आहे. 'इस्रायलच्या विजयासाठी फक्त गाझा नाही, तर राफावर देखील हल्ला करणे गरजेचे आहे, असा संदेश इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. नेत्यानाहू यांच्या वक्तव्यामुळे अमेरिका देखील आश्चर्यचकीत झाली आहे.

एएफपी रिपोर्टनुसार, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी राफा शहरावर हल्ला करण्याची तारीख निश्चित केली आहे. इस्रायलचं म्हणणं आहे की, गाझा हे हमासच्या शेवटच्या बालेकिल्ल्यापैकी एक आहे. त्यांनी नेमका केव्हा हल्ला करणार, याबाबत माहिती दिली नाही. मात्र, हमासवर विजय मिळविण्यासाठी 'राफामधील दहशतवाद्यांचा खात्मा करणे आवश्यक आहे, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हल्ल्याची तारीख निश्चित केली आहे.

Pm Benjamin Netanyahu
Rahul Gandhi : हेलिकॉप्टरचं संपलं इंधन, प्रचाराचं गणित बिघडलं; मध्य प्रदेशात अडकले राहुल गांधी

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी हमासच्या बटालयिनचा खात्मा करण्यासाठी राफामध्ये आयडीएफ ऑपरेशनची तारीख निश्चित केली आहे. दुसरीकडे संयुक्त राज्य अमेरिकेने याचा विरोध करण्याचं ठरवलं आहे. या घटनेमुळे मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

Pm Benjamin Netanyahu
TMC MP Protest: टीएमसीचे खासदार निवडणूक आयोगाबाहेर करत होते निदर्शने, पोलिसांनी घेतलं ताब्यात

व्हाईट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलं की, 'आम्ही सातत्याने स्पष्ट केली आहे की, राफामध्ये होणाऱ्या कोणत्याही ऑपरेशनचं समर्थन करत नाही. आम्हाला त्याबाबत कोणतेही संकेत मिळाले नव्हते की, ते गाझामध्ये काही ऑपरेशन करण्याचा तयारीत आहे'.

किर्बी यांनी पुढे म्हटलं की, 'इस्रायलने आम्हाला कोणतंही आश्वासन दिलेलं आहे की, 'राफा आणि त्याच्या आसपास कोणतंही ऑपरेशन होणार नाही, जोपर्यंत तेथील लोक इतर ठिकाणी स्थलांतर करत नाही'. दरम्यान, संयुक्त राज्य अमेरिकेने या हल्ल्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com