Rahul Gandhi : हेलिकॉप्टरचं संपलं इंधन, प्रचाराचं गणित बिघडलं; मध्य प्रदेशात अडकले राहुल गांधी

Rahul Gandhi Helicopter: राहुल गांधी निवडणूक सभेसाठी मध्य प्रदेशातील शहडोल येथे पोहोचले होते. मात्र निवडणूक सभा आटोपल्यानंतर राहुल गांधी शहडोलमध्ये अडकले.
Rahul Gandhi Helicopter
Rahul Gandhi HelicopterSaam Tv

Rahul Gandhi Helicopter:

देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सर्व नेते पूर्ण ताकदीने प्रचारात व्यस्त आहेत. यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी निवडणूक सभेसाठी मध्य प्रदेशातील शहडोल येथे पोहोचले होते. मात्र निवडणूक सभा आटोपल्यानंतर राहुल गांधी शहडोलमध्ये अडकले.

याचं कारण म्हणजे राहुल ज्या हेलिकॉप्टरने आले होते, त्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन नसल्यामुळे ते उड्डाण करू शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. इंधन टंचाईची माहिती समोर येताच प्रशासन सतर्क झाले असून त्यासाठी भोपाळहून इंधन मागवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या येण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच राहुल गांधी एका खासगी हॉटेलमध्ये थांबले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahul Gandhi Helicopter
Lok Sabha Election: हत्या, बलात्कार, द्वेषयुक्त भाषण; पहिल्या टप्प्यातील 16 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे; 42 जागांवर रेड अलर्ट जारी

याबाबत माहिती देताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले की, ''हवामान खराब आहे. शहडोलमध्ये पाऊस आणि गारपीट झाली असून त्यामुळे इंधन येण्यास विलंब होणार आहे. खराब हवामानामुळे राहुल गांधींचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी आज रात्री शहडोलमध्ये राहणार आहेत. आता आम्ही मंगळवारी सकाळी निघू.''  (Latest Marathi News)

शहडोलचे खासदार कुमार प्रतीक यांनी सांगितले की, इंधनाच्या कमतरतेमुळे राहुल गांधींचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही. राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरसाठी इंधन जबलपूर येथून आणण्यात येणार आहे. इंधन वेळेवर पोहोचले असते तर राहुल गांधी निघू शकले असते, पण खराब हवामान आणि पावसामुळे इंधन पोहोचण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Rahul Gandhi Helicopter
Rahul Gandhi: महिलांना एक लाख रुपये, 30 लाख सरकारी नोकऱ्या; राहुल गांधींनी मध्य प्रदेशात दिली मोठी आश्वासने

दरम्यान, राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशच्या सिवनी आणि शहडोलमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. सिवनी आणि शहडोल येथील जाहीर सभांमध्ये राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, या देशाचे मालक आदिवासी आहेत. मंडला आणि शहडोल या राज्यातील आदिवासी बहुल लोकसभा जागा आहेत. या जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com