Prajwal Revanna: सेक्स स्कँडलने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! देवेगौडांच्या नातू अन् मुलावर गुन्हा दाखल; शेकडो क्लिप्स व्हायरल

Prajwal Revanna scandal: देवेगौडा यांचे आमदार चिरंजीव एच. डी. रेवण्णा आणि खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे.
Prajwal Revanna scandal:
Prajwal Revanna scandal: Saamtv

जनता दल सेक्युलर सेक्युलर पक्षाचे नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या कुटुंबाविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेगौडा यांचे आमदार चिरंजीव एच. डी. रेवण्णा आणि खासदार नातू प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल देवेगौडा यांचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हासन जिल्ह्यातील होलेनरासीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून कलम ३५४अ, ३५४ड, ५०६, ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी हे राज्यातील सर्वात मोठे सेक्स स्कँडल आहे असा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने सहायक पोलिस महानिरीक्षक बी के सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.

Prajwal Revanna scandal:
Weather Alert: राज्यात पुढील ४ दिवसांत उष्णतेची लाट येणार; मे महिन्याचा पहिला आठवडा 'ताप'दायक ठरणार

प्रज्ज्वल देवेगौडा हे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुतणे असून कुमार स्वामी यांचा पक्ष जनता दल सेक्युलर हा सध्या भाजपचा मित्र पक्ष आहे. त्याचबरोबर प्रज्ज्वल हे खासदार असून हासन लोकसभा मतदारसंघाचे ते उमेदवार आहेत. 26 एप्रिलला हसन लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे.

Prajwal Revanna scandal:
Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com