Israel News: इस्त्रायलच्या राफावरील हल्ल्यात 9 पॅलेस्टिनी ठार; जिनिव्हा येथे नागरिकांकडून निदर्शने

Town of Rafa Attack News: हमास संघटनेने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यात झालेल्या युद्धाच सारं जर हादरलं होतं. इस्त्रायलवर आणि हमायच्या युद्धाच हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
Israel News
Israel NewsSaam TV

हमास संघटनेने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यात झालेल्या युद्धाच सारं जर हादरलं होतं. इस्त्रायलवर आणि हमायच्या युद्धाच हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. या युद्धाला सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेला होता. मात्र परत एकदा याच युद्धाची ठिणगी पुन्हा एकदा पेटली आहे. इस्त्रायलच्या सैन्याने पश्चिम आशियातील एका रहिवासी इमारतीवर हवाई हल्ला केलाय.या घटनेत साधारण नऊ पॅलेस्टिनी ठार झाले.या हल्ल्यामुळे तणाव आणि संघर्षाचे वातावरण निर्माण झाले.

Israel News
International women's Day: राज्याचे चौथे महिला धोरण; 'वर्क फ्रॉम होम'ला प्रोत्साहन, मिळेल मातृत्व आणि पितृत्वाची रजा

इस्त्रायलच्या सैन्याने शुक्रवारी रात्री दक्षिण गाझा पट्टीतील राफा या शहरावर हवाई हल्ला केला आहे. यावेळी या सैन्याने राफाच्या तेल सुल्तान या पश्चिम भागातील एका रहिवासी इमारतीला केंद्रित केले. या हल्ल्यात साधारण नऊ पॅलेस्टिनी ठार झाले अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

या इमारतीत झालेल्या हल्ल्यात सहा लहान मुले आणि दोन महिला तसचे एक पुरुष यांचे मृतदेह 'अब युसुफ अल नज्जर'रुग्णालयात नेण्यात आले. या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नवरा- बायको आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश अल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.याचबरोबर या हल्ल्यात अन्य दोन नातेवाईकांचाही समावेश असल्याचे समजते.

इस्त्रायलच्या सैन्याने केलेल्या हल्ल्याच्या पश्चात २४ तासांचा कालावधी ३७ जणांचा मृत्यू झाला. जगात मानवी मूल्ये आणि नैतिकता व्यक्तींमध्ये जराही राहिलेली नसल्याची खंत मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्ती केलीये. शिवाय इस्त्रायलच्या सैन्याने विस्थापित राहत असलेले लोक, लहान मुले आणि महिला राहत असलेल्या घरावर अनेक बॉम्बहल्ला केला असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण गाझा येथील राफा शहरावर झालेल्या नऊ पॅलेस्टिनीचा मृत्यू झाला होता. पॅलेस्टिनींना पाठिंबा देण्यासाठी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे नागरिकांकडून निदर्शने करण्यात आली होती. हा नरसंहार लवकरात लवकर थांबवावा अशी निदर्शन करण्याऱ्या नागरिकांची इच्छा व्यक्त केली.

Israel News
Mexico International Airport: फ्लाइट टेक ऑफ होणारच होती..इतक्यात इमर्जन्सी गेट उघडून प्रवासी आला बाहेर अन् केलं भयंकर कृत्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com