Share Market : इराण- इस्त्रायलच्या युद्धाच्या झळा, शेअर मार्केटची होरपळ; फक्त १५ मिनिटांत ५ लाख कोटी बुडाले

Iran Israel War Effect On Share Market : सध्या जगभरात इराण -इस्त्रायल युद्धाची चर्चा सुरु आहे. या युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
Share Market
Share Market Saam Tv

सध्या जगभरात इराण -इस्त्रायल युद्धाची चर्चा सुरु आहे. या युद्धाचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये (Share Market Down) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

शेअर मार्केटमध्ये आज सकाळी सेनसेक्स (Sensex) 724 अंकानी घसरले असून सध्या 73,531.14 अंकावर व्यव्हार करत आहे. तसेच निफ्टीमध्येदेखील (Nifty) घसरण झाली आहे. निफ्टी 200 पेक्षा जास्त अंकानी घसरली असून 22,315.20 अंकावर व्यव्हार करत आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे अवघ्या १५ मिनिटांत ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

इराण इस्त्रायलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. भारतीय शेअर मार्केटमध्ये BSE लिस्टेड कंपन्याचे मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांवरुन 394.68 लाखांवर आले आहे. मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेनसेक्स 74,244.90 वर तर निफ्टी 22,519.40 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समध्ये लिस्टेड ३० कंपन्यापैकी फक्त २ कंपन्याचे शेअर मार्केटमध्ये चांगले व्यव्हार करत आहे. तर टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, एनटीपीसी, पॉवर ग्रिट या कंपन्याच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण दिसून येत आहे.

Share Market
Today's Gold Silver Rate : सोनं ७३ हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

सेनसेक्समध्ये लिस्टेड कंपन्यांमध्ये सन फार्मा, मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड, टायटन, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुर्बो, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

देशासह जगभरात आशिआई मार्केटमध्येही शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. इराण-इस्त्रायलमधील तणाव आणि कच्च्या तेलाच्या किंमतीच्या वाढीचा नकारात्मक परिणाम आशिआई मार्केटवर होत आहे.

Share Market
Petrol Diesel Rate 15th April: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com