Iran Attack On Israel Saam Tv
देश विदेश

Iran Attack On Israel: युद्धाचा भडका! इराणच्या हल्ल्यात इस्रायल हादरला, १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागली

Iran Missiles Attack On Israel: इराणने इस्रायलला हल्ल्याचे प्रत्युत्तर दिलं. इस्रायलवर इराणने शुक्रवारी रात्री उशिराला १५० पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

इस्रायल आणि इराणमधील तणाव चांगलाच वाढला आहे. इस्त्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ले केले होते. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे दोन अणू शास्त्रज्ञ आणि लष्कराच्या २० कमांडरचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे संतापलेल्या इराणने इस्रायलला प्रत्युत्तर दिले. इराणच्या सैन्यांनी इस्रायलवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा इराणने इस्रायलच्या दिशेने १५० पेक्षा जास्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस नावाच्या मोहिमेद्वारे इराणने इस्राइलला प्रत्युत्तर दिलं.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणी माध्यमांनी दावा केला आहे की, इस्रायलच्या विविध शहरांवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि जेरुसलेम आणि तेल अवीवसह अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. या हल्ल्यात १५ जण जखमी झाले आहेत.

क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलमधील अनेक भागात सायरन वाजवण्यात आले, अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सेसने एका निवेदनातून दिली. इराणकडून इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलचे हवाई संरक्षण दल देखील प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. नागरिकांना बॉम्ब आश्रयस्थानांमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या हल्ल्यांदरम्यान इराणने दावा केला आहे की, त्यांनी एका इस्रायली पायलटला जिवंत पकडले आहे. हा पायलट अलीकडेच इराणी लक्ष्यांना लक्ष्य करणाऱ्या विमानांपैकी एकाचा सदस्य होता. इस्रायलकडून अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हा दावा अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे आणि युद्धासारखी परिस्थिती कायम आहे. इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT