Israel-IranWar : पुढच्या वेळी सुपडासाफ; इराण-इस्रायल भडका उडाला, डोनाल्ड ट्रम्प यांनी ओतलं तेल, थेट धमकीच दिली!

Donald Trump Warns Iran : इस्रायलनं इराणवर हवाई हल्ले केल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. समझोता करून टाका, अन्यथा पुढच्या वेळी सगळंच संपेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
Israel  Iran Donald Trump
Israel Iran Donald Trumpsaam tv
Published On

इराण-इस्रायल या दोन देशांत भडका उडाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देऊन आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र केंद्रे आणि रहिवासी परिसरात हवाई हल्ले करून सगळं उद्ध्वस्त केलं आहे. या हल्ल्यानं तीळपापड झालेल्या इराणनं जोरदार प्रत्युत्तर देऊ असा थेट इशारा दिला आहे. या दोन देशांच्या वादात ट्रम्प यांनी उडी घेतली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सोशल मीडियावरील पोस्टद्वारे थेट धमकी दिली आहे. या हल्ल्याची मला आधीच कल्पना होती. इराणकडे अजूनही अण्वस्त्र करार करण्याची संधी आहे. समझोता करा, अन्यथा सर्व काही संपेल. मी इराणला वारंवार संधी दिली आहे. जर समझोता केला नाही तर पुढचा हल्ला आणखी धोकादायक असेल, असंही ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Israel  Iran Donald Trump
Iran Israel war : युद्धाची ठिणगी पेटली! इस्रायलचा इराणवर हल्ला; लष्कराचे टॉप २० कमांडर ठार, अणु केंद्रांचं अतोनात नुकसान

इराणच्या अण्वस्त्र योजनेवरच घाव घातल्याचा दावा इस्रायलने केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. त्यानंतरच त्यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सशस्त्र दलांचे प्रमुख मोहम्मद बाघेरी आणि रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचे कमांडर हुसैन सलामी यांच्यासह सहा प्रमुख वैज्ञानिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिला जाईल, असा थेट इशारा इराणचे प्रमुख नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी दिला आहे.

Israel  Iran Donald Trump
Israel-Iran Conflict: इस्त्रायलचा मोठा हल्ला, महत्वाचे ठिकाणे उद्धवस्त, इराणकडून एअरस्पेस बंद|VIDEO

इराणच्या मीडियानुसार, राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. त्यात मोठी हानी झाली आहे. अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून आपत्कालीन बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी केली आहे. इस्रायलनं आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे, असा आरोपही त्यात केला आहे. तसेच इस्रायलला धमकीही दिली आहे. आमच्याकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर हे यापेक्षाही भयंकर असणार आहे, असं इराणनं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला सोशल मीडियावरील पोस्टद्वारे थेट धमकी दिली आहे. इराणला समझोता करण्याची अनेकदा संधी दिली. आता तरी समझोता करा असं कठोर शब्दांत इराणला सांगितलं होतं. त्यांनी प्रयत्नही केले, पण पूर्णत्वाकडे गेले नाहीत. मी याआधीच सांगितलं होतं की जे होईल ते यापेक्षाही भयानक असणार आहे. अमेरिका हे जगात सर्वात शक्तिशाली आणि घातक शस्त्रे तयार करतोय. इस्रायलकडेही अशी शस्त्रे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना त्याचा वापर करताही येतो. इराणचे काही कट्टर नेतेही खूप बोलत होते. पण त्यांच्यासोबत काय होणार आहे, हे त्यांनाच ठाऊक नव्हते. आता ते सगळे मारले गेले आहेत. इराणने समझोता केला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

आतापर्यंत खूप नुकसान झालं आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. हे थांबवण्याची अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. पुढच्या काळात यापेक्षाही भयंकर हल्ला होईल. इराणला समझोता करावाच लागेल. आता आणखी नुकसान नको, आणखी मृत्यू नको. वेळ निघून जाण्याआधी समझोता करा. देव तुमचं सगळ्यांचं भलं करो, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com