Inspiring Story
Inspiring Story Yandex
देश विदेश

Inspiring Story: चक्क पाण्याविना बहरली स्ट्रॉबेरी; उत्तर प्रदेशातील पठ्ठ्याने कमावले लाखो रुपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खरं तर पाण्याशिवाय कोणत्याही पिकाची लागवड करणं, हे नवलंच आहे. परंतु उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशच्या धीरज वर्मा यांनी पाण्याशिवाय स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे, हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो. परंतु , धीरज वर्मा या शेतकऱ्याने उत्तर प्रदेशच्या एका गावात स्ट्रॉबेरीची(Strawberry) यशस्वी शेती केली आहे.

महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणारे हे पीक तसेच पाण्याशिवाय देखील यशस्वीरीत्या पिकविला आहे. ते मोठे आर्थिक उत्पन्न देणारे ठरले आहे. शेतीतून नवनवीन प्रयोग करून शेतकरी चांगले उत्पादन घेत असतात. अनेकदा पिकांना पुरक माती असूनही काही ठिकाणी शेती करण्यात अडचणी येतात.

मात्र, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh)धीरज वर्मा यांनी या नियमांना मागे सारलं आहे. धीरज यांनी थेट मातीशिवाय स्ट्रॉबेरी पिकवली आहे. त्यांनी ही स्ट्रॉबेरी विकून या लाखो रुपयांची कमाई देखील केली आहे. खरं तर पाण्याशिवाय स्टॉबेरी लावून धीरज यांनी भरघोस उत्पन्न मिळवलं आहे. त्यांचं सगळीकडे कौतुक केलं जात आहे.

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे एक लहान आकाराचं फळ असून लाल रंगाचं फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडपणा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीमध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व 'क' , 'ब' आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात.

साधारण महाराष्ट्रातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशच्या धीरज वर्मा यांनी हायड्रोपोनिक शेतीच्या मदतीने हा नफा कमावला आहे. हायड्रोपोनिकही शेती इस्राएलमध्ये केली जाते. यात फक्त पाण्यावर पिकं लावली जातात.

वर्मा यांनी हीच पद्धत वापरून स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहेत. साधारण एका सीजनमध्ये धीरज वर्मा यांनी पाच टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन काढलं आहे. याच स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून त्यांना तीन लाख रुपयांचा नफा देखील झाला आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

Today's Marathi News Live: पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळलं; वाहनांचं मोठं नुकसान

Team India Head Coach : गौतम गंभीर होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक?; २ संकेत अन् जोरदार चर्चा

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Sobhita Dhulipala : गुलाबी ड्रेस अन् कानात झुमके छान छान, कान्समध्ये शोभिताचा जलवा!

SCROLL FOR NEXT