सातारा - थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी या पिकाचे चक्क दुष्काळी भागामध्ये एका पठ्ठ्याने लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. आत्तापर्यंत आपण ऐकून होतो की महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रॉबेरी (Strawberry) या फळाची लागवड केली. परंतु खटाव येथील शेतकरी राजेश देशमुख यांनी तीन वर्षे या पिकावर अभ्यास करून अवघ्या 30 गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आणि त्यानंतर दररोज पंचवीस ते तीस हजार प्रमाणे महिन्याकाठी या शेतकऱ्याने (Farmer) तब्बल पाच लाखांची उलाढाल सुरू केली आहे. आजपर्यंत या केलेल्या अभिनव प्रयोगातून राजेश देशमुख यांनी वीस लाखांची उलाढाल केली असून या पिकाला लागणारा सर्व खर्च वगळता बारा लाख रुपयांचा निव्वळ फायदा मिळवलेला आहे. सुरुवातीला महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी पिकणारी स्ट्रॉबेरी उष्ण हवामानात कशी पिकवायची हे मोठे आव्हान होते. (Latest Agriculture News)
परंतु राजेश देशमुख यांनी दुष्काळी भागात असणार आहे या ओसाड जमिनीवर महाबळेश्वर येथील काही तज्ञ शेतकऱ्यांना आणलं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर हा अभिनव प्रयोग करण्यास सुरुवात केली. सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये पाण्याची वन वन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आत्तापर्यंत कमी पाण्यात येणारी पिके येथील शेतकरी घेत होते कोणीही स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही असे प्रयोग राजेश देशमुख या शेतकऱ्यांनी केल्यामुळे आता इतर शेतकऱ्यांनाही या गोष्टीचा फायदा होणार आहे.
हे देखील पहा -
एवढ्यावर न थांबता देशमुख यांनी आता स्ट्रॉबेरीमध्ये अंतर पीक घ्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. सध्या स्ट्रॉबेरीच्या या शेतीमध्ये काही क्षेत्रांमध्ये स्ट्रॉबेरीला आंतरपीक म्हणून त्यांनी लसणाची सुद्धा लागवड केलेली आहे. तीन वर्ष अभ्यास करून लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या पिकाने देशमुख यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. या स्ट्रॉबेरीच्या लागवडीमुळे केवळ राजेश देशमुख यांना फायदा झाला नसून या भागात असलेल्या महिलांना सुद्धा हाताला रोजगार मिळालेला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे रोजगार थांबले होते. परंतु या भागातील महिलांना आलेल्या स्ट्रॉबेरीची देखभाल करणे तोडणी करणे असा रोजगार उपलब्ध झाल्यामुळे या भागातील महिलांमध्ये सुद्धा समाधानाचे वातावरण आहे.
केवळ महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी विकणारी स्ट्रॉबेरी आता साताऱ्याच्या दुष्काळी भागात सुद्धा पिकणार हे ऐकून कोणाला विश्वास बसला नसता परंतु राजेश देशमुख यांनी ही गोष्ट करून दाखवल्यामुळे आता या भागातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा नवीन प्रयोग करून लाखो रुपये कमावण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.