Iran Isreal  Saam tv
देश विदेश

Iran Israel War : मोसादची महिला गुप्तहेर, खोमेनींच्या घरात? कातील हसीनाने केला शास्त्रज्ञांचा गेम, वाचा स्पेशल रिपोर्ट - VIDEO

Iran Israel War update : मोसादच्या कातील हसीनाने इराणची झोप उडवली.. कारण खोमेनींच्या घरापर्यंत आणि अणू शास्त्रज्ञांच्या बेडपर्यंत पोहचलेल्या कातील हसीनाने बाजी पलटवलीय.. मात्र ही कातील हसीना नेमकी कोण? आणि तिने कशी बाजी पलटवलीय? पाहूयात...

Bharat Mohalkar

इस्त्रायलविरोधात इराणचं पारडं जड होत चाललंय.. मात्र कातील हसीना या मोसादच्या महिला गुप्तहेरानं इराणची झोप उडवलीय......मनमोहक सौंदर्य आणि कातील अदांमुळे हसीना थेट इराणच्या सम्राटाच्या घरात पोहचली.. एवढंच नाही तर तिने आपल्या मादक अदांनी अणुशास्त्रज्ञांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिथेच इराणी शास्त्रज्ञांचा घात झाला... तब्बल 9 अणू शास्त्रज्ञांना तिने अल्लाघरी पाठवलंय...

'मोसाद'ची खतरनाक लेडी किलर…

फ्रेंच नागरिकत्व असलेली कॅथरीन पेरेज शेकेडकडून इराणचा गेम

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित 9 वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि लष्करी अधिकारी टार्गेट

वर्षभरातच सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्सच्या कुटुंबापर्यंत पोहोचली

शास्त्रज्ञांशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीननं इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांशी मैत्री

'हनी ट्रॅप'चा वापर करून माहिती मिळवली आणि गरज पडल्यावर थेट खूनही केले

त्याच फोटोंच्या आधारे इस्त्राईलने 13 जूनला इराणच्या अणू केंद्रावर आणि तेहरानवर हल्ला केला.. त्यामागे कातील हसीनाचा गेम होता... इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर इराणी गुप्तचर यंत्रणांना कातील हसीनाचा खेळ लक्षात आला... मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता....कातील हसीना पसार झाली होती... आणि 9 शास्त्रज्ञांनी जीव गमावला होता.

मोसादने इराणमध्ये फक्त कातील हसीनाच्या माध्यमातूनच टॉप लष्करी अधिकारी आणि अणू शास्त्रज्ञांचा गेम केला नाही तर त्यासाठी गुप्तहेर महिलांची ब्रिगेड तयार करुन इराणच्या घरात घुसवली... त्यामुळे इराणविरोधात सुक्ष्म नियोजन करुन हल्ले करणं इस्त्राईला शक्य होतंय... त्यामुळे कोणत्याही देशातील अधिकाऱ्यांनी सावधपणे पावलं टाकणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

Kendra Trikona Rajyog: 30 वर्षांनंतर शनीने बनवला पॉवरफुल योग; 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Todays Horoscope: 'या' राशीच्या व्यक्तींनी मनाचा कौल घेऊन पुढे जावं; वाचा राशीभविष्य

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

SCROLL FOR NEXT