
अक्षय बडवे, साम टीव्ही
पुणे : पुण्यात बस चालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यात पीएमपीएमएलच्या बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केली आहे. या मारहणीचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनपा ते तळेगाव ढमढेरेदरम्यान ही घटना घडली. पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पीएमपीएमएलच्या मनपा ते तळेगाव ढमढेरे बसच्या चालकाने प्रवाशाला बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकाजवळ हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बस चालकाने शिक्रापूर चाकण चौकात बस थांबवून खाली उतरून प्रवाशाला बेल्टने मारहाण केली.
काही प्रवाशांनी चालक नशेत असल्याचा आरोप केला आहे. चालक हा बस चालवताना देखील अस्वस्थ असल्याचे काही प्रवाशांनी सांगितलं. या प्रकारामुळे पीएमपीएमएल चालकांच्या वर्तणुकीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांना मारहाण झाल्याने सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पुण्यातील शिक्रापूरमधील पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भर रस्त्यात एका तरुणाने दारुच्या नशेत धिंगाणा घातला. या तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून लोकांना शिवीगाळ केली. काही वेळानंतर नागरिकांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऋषिकेश सुकाळकर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश हा नेवासाचा रहिवासी आहे. ऋषिकेशला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.