Mumbai News : मुंबईत भल्या पहाटे धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; पर्स वाचवताना तोल गेला अन्..

Mumbai Crime News : मुंबईत भल्या पहाटे धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रवासी महिलेच्या पतीला हात गमवावा लागला आहे.
mumbai news
Mumbai Crime News Saam tv
Published On

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : मुंबईहून नांदेडला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये भल्या पहाटे चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. भांडुप आणि कांजूरदरम्यान पहाटे साडेतीन वाजता ट्रेनचा वेग कमी झाल्याने दरोडेखोर डब्ब्यात शिरला. त्यानेतर या दरोडेखोराने ४४ वर्षीय महिला प्रवाशाची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा पती गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोर भल्या पहाटे ट्रेनमध्ये शिरला. त्यानंतर दरोडेखोराने महिला प्रवाशाची पर्स चोरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे या चोराच्या मागे महिला प्रवासी दिपाली धावल्या. महिला प्रवासी दिपाली पर्स वाचवण्याचा प्रयत्नात ट्रेनमधून खाली पडल्या.

दिपाली ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतर पती त्यांना वाचवायला गेले. त्यावेळी त्यांचाही तोल गेला. त्यामुळे ते देखील ट्रेनमधून खाली पडले. या घटनेत त्यांच्या हात ट्रेनखाली आला. यामुळे त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेत महिलेच्या पतीला एक हात गमवावा लागला आहे.

mumbai news
Ulhasnagar Crime : नशा करण्यासठी पैशांची चणचण भासू लागली; चोरट्याकडून थेट मंदिरातील महादेवाचा नाग चोरण्याचा प्रयत्न, VIDEO

दरोडेखोरीच्या विरोधात तक्रार करून वीस दिवस उलटून गेले आहेत. तरी कुर्ला जीआरपीला आरोपीचा शोध घेता आला नाही. यामुळे कुर्ला जीआरपीने दोन संशयितांचे रेखाचित्र जारी केले आहेत. संशयित व्यक्ती कुठे आढळल्यास दिसून आल्यास कुर्ला जीआरपी किंवा कुर्ला जीआरपी कंट्रोल रूमला कळविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

mumbai news
Iran Israel Conflict : इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री; तीन अणुप्रकल्पावर हल्ला, आता इराण काय भूमिका घेणार? VIDEO

दरम्यान, मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवरून नांदेडला जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये डॉक्टर दाम्पतासोबत ही घटना घडली आहे. या घटनेत महिलेच्या पतीला एक हात गमवावा लागला आहे. मुंबईतील दरोड्याच्या घटनेने रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com