Ulhasnagar Crime : नशा करण्यासठी पैशांची चणचण भासू लागली; चोरट्याकडून थेट मंदिरातील महादेवाचा नाग चोरण्याचा प्रयत्न, VIDEO

Ulhasnagar Crime News : नशा करण्यासठी पैशांची चणचण भासू लागल्याने चोरट्याने थेट मंदिरातील महादेवाचा नाग चोरण्याचा प्रयत्न केला.
ulhasnagar
ulhasnagar News Saam tv
Published On

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरात महादेवाच्या मंदिरातून पिंडीवरील धातूचा नाग चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. चोरीच्या प्रयत्नाची ही घटना २१ जून रोजी मध्यरात्री ३ वाजता घडली. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उल्हासनगरमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प ३ ओटी सेक्शन येथील महादेव मंदिरात एक चोरटा रात्रीच्या सुमारास शिरला. या चोरट्याने महादेवाच्या पिंडीवरील तांब्याचा किंवा पितळेचा नाग काढला. त्यानंतर मंदिराच्या ओट्यावर ठेवला. पुढे त्याने उडी मारून कंपाउंडबाहेर जाऊन नाग बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाग चुकून खुर्चीत पडल्यामुळे आवाज झाला. त्यामुळे परिसरातील कुत्रे भुंकू लागले. या कुत्र्यांच्या आवाजाने चोर घाबरला. त्यानंतर नाग तिथेच सोडून पळ काढला.

ulhasnagar
Iran Israel Conflict Effect : इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका; भारतात काय काय महागणार? जाणून घ्या

सकाळी स्थानिकांना मंदिराबाहेर नाग दिसल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही तपासले आणि चोरीचा प्रयत्न उघडकीस आला. स्थानिकांच्या मते गेल्या काही काळात या परिसरात नशेखोर तरुणांचा वावर वाढलाय. त्यामुळे नशेसाठी पैसे मिळवण्यासाठीच हा चोरीचा प्रयत्न झाला असावा, असा त्यांचा संशय आहे. यामुळे स्थानिकांनी धार्मिक स्थळांभोवती पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

ulhasnagar
Matheran Accident : माथेरान घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्...

वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात भर रस्त्यात हाणामारी

कल्याणनगर महामार्गावरील शहाड उड्डाणपुलाजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक पोलीस आणि एका वाहन चालकामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली. हाणामारीची घटना ही सीसीटीव्हीत आणि मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ulhasnagar
Mangrove Park : भारतातील पहिलं 'मँग्रोव्ह पार्क' लवकरच खुलं होणार; काय आहेत पार्काची वैशिष्ट्ये? वाचा

शहाड उड्डाणपुलावर दररोज वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याने पोलीस आणि वाहन चालकांमध्ये सतत बाचाबाची होत असते. मात्र, कालची बाचाबाची थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com