Matheran Accident : माथेरान घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्...

Matheran Road Accident : माथेरानला जाताना पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झाला. अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Matheran Accident : माथेरान घाटामध्ये पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात; अवघड वळणावर कारचं नियंत्रण सुटलं अन्...
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही

ठाणे : माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दैवबलवत्तर म्हणून यातील सात प्रवाशी थोडक्यात बचावले आहेत. घाटातील पीटकर पॉईंट येथील अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट रस्त्याची सुरक्षा रेलिंग तोडून खोल दरीच्या बाजूस म्हणजेच रस्ता आणि खोल दरीच्या मध्ये हेलकावे खात अडकून राहिले.

ठाणे जिल्ह्यातील बालकुम येथील राहणारा वाहन चालक सूरज येसले हा परिसरातील सहा पर्यटकांना वाहन कारमध्ये बसून भाडे म्हणून घेऊन आला होता. सकाळी सूरज हा माथेरान घाट चढण्यासाठी म्हणून नेरळ येथून सुरुवात केली होती. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वॉटर पाईप या रेल्वे स्थानकाच्या जवळील असलेल्या पिटकर या अवघड वळणावर घाट चढायला सुरुवात केली. त्याचवेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com