
इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देशाच्या युद्धाने जग हादरून गेलं आहे. इराण आणि इस्त्रायलच्या युद्धाचा परिणाम भारत आणि पश्चिम आशियाई देशांतील व्यापारावर झाला आहे. यात इराण, इराक, जॉर्डन, लेबनान, सीरिया, यमन या देशाचा समावेश आहे. या देशांत भारताची एकूण निर्यात 8.6 अब्ज डॉलर आणि आयात 33.1 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचते.
मुंबईतील निर्यातक आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्टीजचे संस्थापक शरद कुमार सराफ यांनी इशारा दिला आहे की, युद्धाचा भारताच्या व्यापारवर परिणाम होईल. कंपनीचा इराण आणि इस्त्रायलला पाठवण्यात येणारा माल देखील रोखण्यात आला आहे. त्यामुळे आता युद्ध मोठं संकट ठरू लागलं आहे'.
भारताने आर्थिक वर्षात इराणमध्ये एकूण १.२४ अब्ज डॉलरची निर्यात केली. या निर्यातीत बासमती तांदूळ(753.2 मिलियन डॉलर ), केळी, सोयाबीनचं पीठ, चणे, चहा यासारख्या वस्तूंचा समावेश आहे. या काळात भारताने इराणहून ४४१.८ मिलियन डॉलरच्या वस्तू आयात केल्या. इस्त्राइलसोबत भारताचा व्यापार 2.1 अब्ज डॉलर (निर्यात) आणि 1.6 अब्ज डॉलर (आयात) इतका झाला आहे. भारतावर याआधीच अमेरिकेच्या धोरणांचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम भारताच्या व्यापारावर झाला आहे.
भारताला सर्वात मोठी चिंता हॉर्मुज जलडमरुमध्याबाबत आहे. तिथून भारतातील ६० ते ६५ टक्के कच्चा तेलाचा पुरवठा केला जातो. इराणने हा जलमार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे. या मार्गातून जगातील २० टक्के तेलाचा व्यापार होतो.
जलडमरुमध्य इराण आणि ओमान देशादरम्यान आहे. या जलमार्गामुळे सौदी अरब, इराण, इराक, कुवैत आणि कतारहून तेल आणि एलएनजी निर्यात केलं जातं. जो देश ८० टक्क्यांहून अधिक जास्त वस्तू आयात करण्यावर अवलंबून असेल. त्यात या देशातून होणारा इंधनाचा पुरवठा खंडित झाला असेल तर देशाच्या व्यापारावर परिमाण होईल. यामुळे इंधन महाग होईल. महागाई होईल. महागाईचा परिणाम रुपयावर दबाव निर्माण होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.