Mangrove Park : भारतातील पहिलं 'मँग्रोव्ह पार्क' लवकरच खुलं होणार; काय आहेत पार्काची वैशिष्ट्ये? वाचा

India’s First Mangrove Park In Mumbai : भारतातील पहिलं 'मँग्रोव्ह पार्क' लवकरच खुलं होणार आहे. या पार्कात वन्यजीवन अनुभवता येणार आहे.
Mangrove Park In Mumbai
India’s First Mangrove Park In Mumbai :Saam tv
Published On

मुंबई आणि पर्यावरणप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील गोराई येथील 'मँग्रोव्ह पार्क' लवकरच सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून वन्यजीवन आणि विविध पक्ष्यांना जवळून पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

मँग्रोव्ह पार्कात ७४० मीटर लांबीचा लाकडी पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. हा पादचारी पूल संपूर्ण मँग्रोव्ह क्षेत्रातून जाणार आहे. पार्काच्या निर्मितीसाठी २०२१ साली मंजुरी देण्यात आली होती. हे पार्क 0.6675 हेक्टर क्षेत्रफळात उभारण्यात आलं आहे. यासाठी सुमारे ३३.४३ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प ८ हेक्टरच्या मँग्रोव्ह इकोसिस्टमचा एक भाग आहे.

Mangrove Park In Mumbai
Maharashtra Politics : शब्द पाळला नाही, ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

महत्वाची बाब म्हणजे मँग्रोव्ह पार्क तयार करताना कोणत्याही प्रकारची झाडांची तोडफोड करण्यात आलेली नाही. पार्क उभारण्यासाठी इको-फ्रेंडली साहित्य आणि सौर उर्जेचा वापर करण्यात आला आहे. पार्कातील ८० टक्के वीज सौर उर्जेवर चालणारी आहे. वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितलं की, पार्काचं काम अंतिम टप्प्यात आहे. पार्क लवकरच नागरिकांसाठी उघडण्यात येणार आहे.

पार्कची वैशिष्ट्ये:

या पार्कात २ मजली रूफटॉप रेस्टॉरंट, गिफ्ट शॉप, ग्रंथालय, ऑडिओ-विज्युअल रूम, माहिती केंद्र, १८ मीटर उंच पक्षी निरीक्षण टॉवर, मँग्रोव्ह जंगलातून जाणारा लाकडी पादचारी पूल, पूलाच्या शेवटी विशेष निसर्ग डेक पाहायला मिळणार आहे.

Mangrove Park In Mumbai
Mumbai Local train Fight : धावत्या लोकलमध्ये राडा! घाटकोपर आणि मुलुंडदरम्यान प्रवाशांची तुंबळ हाणामारी, VIDEO

गोराईमधील पार्क सिंगापूरच्या मँग्रोव्ह पार्कच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्कात मानवाला होणारे फायदे, मँग्रोव्हच्या (कांदळवन) विविध जाती, पर्यावरण साखळीतील महत्व या विषयी माहिती दिली जाणार आहे. नागरिकांना या पार्कात निसर्गरम्य पर्यटन करताना येणार आहे. तसेच इतर सुविधा देखील नागरिकांना मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com