uddhav thackeray news
uddhav thackeraysaam tv

Maharashtra Politics : शब्द पाळला नाही, ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ

uddhav thackeray : ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे.
Published on

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना : जालन्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे राज्य सचिव डॉ. संजय लाखे पाटील यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभेचे तिकीट देतो म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत डॉ. संजय लाखे यांनी पक्षाची साथ सोडली. जालना लोकसभा आपल्याकडे येणार नाही, याची काळजी रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व पत्करलेले अंबादास दानवे यांनी घेतल्याचा आरोप डॉ. संजय लाखे यांनी केला आहे.

uddhav thackeray news
Fuel Ban Alert : पेट्रोल पंपावर 'या' वाहनांना मिळणार नाही पेट्रोल आणि डिझेल, १० दिवसांनी निर्णय लागू होणार

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य सचिव असलेले डॉ.संजय लाखे पाटील यांनी आपल्या सचिव पदाचा राजीनामा दिला. लाखे पाटील यांनी राजीनामा पत्रात उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचं सांगितलं. तसेच संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले.

uddhav thackeray news
Celebrity Couple Divorce : ये रिश्ता क्या कहलाता है! आणखी एका सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट? लग्नाच्या १५ वर्षांनंतर संसार मोडला

डॉ. संजय लाखे पाटील काय म्हणाले?

डॉ. लाखे पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र ते त्यांनी पाळलं नाही. खासदार संजय राऊत यांनी जयंत पाटील यांनी विशेष समझौता करून सांगली लोकसभेची जागा घेऊन पराभव पदरात पाडून घेतल्याचा आरोप केला आहे.

uddhav thackeray news
Andhra pradesh Shocker : माजी मुख्यमंत्र्यांच्या कारने एकाला चिरडलं; स्वागताला आलेल्या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू ,भयानक VIDEO

दरम्यान, रावसाहेब दानवे यांचे शिष्यत्व निभावत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिंकता येणारी जालना लोकसभेची जागा येणार नाही, याची काळजी घेतल्याचे देखील त्यांनी म्हटल. याशिवाय सध्या मराठवाड्यात अंबादास दानवे यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही आपली होती. चोरलेला कार्यक्रम घेऊन अंबादास दानवे फुकट कौतुक पदरात पाडून घेत असल्याचा आरोप देखील त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com