Iran Israel Conflict : इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री; तीन अणुप्रकल्पावर हल्ला, आता इराण काय भूमिका घेणार? VIDEO

Iran Israel Conflict News : अमेरिकेनं इराणच्या तीन अणुप्रकल्पावर हल्ला केला. मात्र दुसरीकडे इराणनं हल्ल्याआधीच अणुप्रकल्पाचं युरेनियमचे साठे इतरत्र नेल्याचा दावा केलाय. त्यामुळे इराण आता अमेरिकेविरोधात कोणती भूमिका घेणार.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Iran Israel Conflict
Iran Israel Conflict NewsSaam tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

तेहरानपासून १३५ किमी अंतरावरील फोर्डो अणुउर्जा केंद्र... इराणच्या नतान्झ शहराजवळचा नतान्झ अणुप्रकल्प... अणुप्रकल्पासाठी इंधन निर्मिती करणारे इस्फहान अणुकेंद्र... इराणसाठी अत्यंत महत्वाच्या अशा या तिन्ही अणुप्रकल्पांवर अमेरिकेनं हल्ला करून इस्त्रायल-इराण युद्धात थेट उडी घेतलीय. इराणसाठी हे तिन्ही अणुप्रकल्प किती महत्त्वाचे आहेत. पाहूयात.

फोर्डो अणुऊर्जा केंद्र

१)

2006-2009 दरम्यान गुप्तपणे उभारणी

हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून सुरक्षित

२)

तेहरानपासून 160 किमी दूर

जमिनीखाली सुमारे 300 फूट खोल

३)

3 महिन्यात 60 % शुद्ध युरेनियम उत्पादन

चार अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता

इस्फहान अणुऊर्जा केंद्र

१)

1980-90 मध्ये चीनच्या मदतीनं उभारणी

अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन निर्मिती

२)

संशोधन रिअ‍ॅक्टरसाठी इंधन निर्मिती

प्रकल्पात 3 हजार शास्त्रज्ञ

नतान्झ अणुऊर्जा केंद्र

१)

सर्वात महत्त्वाचे युरेनियम समृद्धीकरण केंद्र

जमिनीखाली सुमारे 8 मीटर खोल

दुसरीकडे बॉम्ब हल्ल्यात फोर्डो अणु तळाचं प्रचंड नुकसान झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं खोडून काढलाय...हल्ल्याआधीच फोर्डो केंद्रातील युरेनियमचा साठा काढण्यात आला होता असा दावा इराणकडून करण्यात आलाय... त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रेडिओएक्टिव्ह उत्सर्जन झालेलं नाही असंही इराणनं म्हटलंय..त्यामुळे अमेरिकन गुप्तचर संस्था इराणच्या अणुतळांची अचूक माहिती काढण्यात अपय़शी ठरली का असा प्रश्नही उपस्थित होतोय.

Iran Israel Conflict
Ulhasnagar Crime : नशा करण्यासठी पैशांची चणचण भासू लागली; चोरट्याकडून थेट मंदिरातील महादेवाचा नाग चोरण्याचा प्रयत्न, VIDEO

कारण 19 जूनच्या सॅटलाईट फोटोनुसार, फोर्डो अणुप्रकल्पाजवळील बोगद्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर 16 ट्रक उभे असल्याचे दिसत होतं तर 20 जूनच्या सॅटलाईट फोटोनुसार, हेच कार्गो ट्रक एक किलोमीटर अंतरावरून वायव्य दिशेत जाताना दिसत आहेत.. त्यामुळे इराणच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खवळलेल्या इराणने अमेरिकेविरोधात एल्गार पुकारला आहे..आणि त्यांचं पुढचं टार्गेट असणार आहे मध्यपूर्वेत तैनात असलेलं अमेरिकेचे सैन्यबळ. अमेरिकेनं सगळ्याचं लष्करी तळांवर हाय अलर्ट दिला असून न्यूर्याक आणि वॉशिंग्टन सारख्या शहरातही अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे..त्यामुळेच अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना याकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com