Maharashtra Politics : औरंगाजेब पवित्र व्यक्ती, टोप्या शिवून...; माजी आमदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ, भाजपकडून कारवाईची मागणी

asif shaikh controversy : औरंगाजेब पवित्र व्यक्ती असल्याचे वक्तव्य माजी आमदार आसिफ शेख यांनी केलं आहे. आसिफ शेख यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.
Maharashtra Politics
malegaon Saam tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : नाशिकच्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आसिफ शेख यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. औरंगाजेब पवित्र माणूस होता, टोप्या शिवून उदारनिर्वाह करायचा, असं वक्तव्य आसिफ शेख यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून आसिफ शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Maharashtra Politics
Mumbai News : मुंबईत भल्या पहाटे धावत्या एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; पर्स वाचवताना तोल गेला अन्..

नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कासाठी स्थापन करण्यात आलेल्या मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची रविवारी पत्रकार परिषद झाली होती. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार आसिफ शेख यांनी एक वादग्रस्त विधान केलं. औरंगजेब पवित्र माणूस होता, टोप्या शिवून आपला उदरनिर्वाह करायचा. औरंगजेब सर्व धर्मांना माननारा सर्वधर्मसमभाव विचाराचा होता. मात्र, औरंगजेबाला बदनाम करण्यासाठी राजकारणासाठी त्याच्या नावाचा उपयोग केला जात आहे, असं वक्तव्य केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत अचानक ७६ लाख मते कशी वाढली? सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? आंबेडकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

आसिफ शेख यांच्या वक्तव्याचे आज नाशिकच्या मालेगावात पडसाद उमटले. आसिफ शेख यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. आसिफ शेख यंना मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचाराची गरज आहे. माजी आमदार असिफ शेख आमच्या मुसलमानांना चुरन देतात, असा देखील त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे हिंदू आणि मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या मागणीनंतर आसिफ शेख यांच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

Maharashtra Politics
Pune News : पुण्यात भर रस्त्यात राडा! PMPML बस चालकाकडून प्रवाशाला बेल्टने मारहाण,VIDEO

छगन भुजबळ काय म्हणाले?

दरम्यान, आसिफ शेख यांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. औरंगजेब टोप्या शिवायचा हा इतिहास आहे. औरंगाजेबाने अन्यायाचा कारभार केला. या काराभाराविरोधात आम्ही आहोत. औरंगाजेबाने संभाजी महाराजांवरही अन्याय केला, असे भुजबळ म्हणाले. अबू आझमी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भुजबळ म्हणाले, 'अबू आझमी यांनी आपसात कटूता निर्माण होईल, असं वक्तव्य टाळलं पाहिजे. मुस्लिम भक्तांची देखील वारी निघते. समतेचा संदेश देणाऱ्या वारीत सर्वच सहभागी होतात, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com