Nagpur : इथे का बसलाय? शाब्दिक वाद टोकाला गेला; धारदार शस्त्राने वार करून तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ

Nagpur Crime news : नागपुरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे नागपुरातील हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nagpur News
Nagpur Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : नागपुरात क्षुल्लक वादावरून तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाची हत्या झाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बसण्याच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादातून कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हत्येची घटना घडली. रवी वाघमारे असं मृतकाचे नाव आहे. तर किशोर ठाकरे असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. तरुणाच्या हत्येच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

Nagpur News
Mumbai Local train Fight : धावत्या लोकलमध्ये राडा! घाटकोपर आणि मुलुंडदरम्यान प्रवाशांची तुंबळ हाणामारी, VIDEO

नेमकं काय घडलं?

नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात किशोर ठाकरे हमाललासोबत गप्पा करत होता. त्या ठिकाणी रवी वाघमारे आला. त्याने किशोरला ' इथे का बसला आहे' येथून उठ म्हणत वाद घातला. किशोर आणि रवीमध्ये शाब्दिक वाद झाला. रागाच्या भरात किशोरने आपल्या जवळच्या चाकूने रवीच्या अंगावर सपासप वार केले. यातच रवीचा जागीच मृत्यू झाला आहे. किशोरवर हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Nagpur News
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत अचानक ७६ लाख मते कशी वाढली? सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? आंबेडकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

तरुणाची सटकली; धारधार शस्त्राने वार करत महिलेला जागीच संपवलं

उधारीवर सिगारेटम न दिल्याने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. चंद्रपुरातील राजुरात ही घटना घडली. १७ वर्षांच्या मुलाने रागाच्या भरात महिलेची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हत्येच्या घटनेने चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. हत्या करणारा आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com