Vande Bharat Express Saam Tv
देश विदेश

Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

Indian Railways loyalty program free ticket benefits : भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी लॉयल्टी प्रोग्राम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील, ज्याद्वारे मोफत रेल्वे तिकीट, चहा-नाश्ता, जेवण आणि तिकिट अपग्रेडसारख्या सुविधा मिळू शकतात.

Namdeo Kumbhar

Indian Railway Free Ticket Scheme : मुंबई, पुण्यापासून दिल्ली आणि कोलकाता चेन्नईपर्यंत रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. गाव खेड्यापासून ते शहरातील उंच उंच टॉवरमधील लोकही रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या आपल्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून खास योजना आणली जात आहे. मोफेत तिकिट आणि चहा-नाश्ता, जेवणही फुकटात या योजनेतून मिळणार आहे. पण ही योजना कुणासाठी आहे? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते? त्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात..

रेल्वेकडून प्रवाशांसाठी एक खास योजना आणणार आहे. या योजनेअंतर्गत फुकटात रेल्वे प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय जेवण, चहा आणि नाश्त्यासाठीही पैसे मोजावे लागणार नाहीत. आता तुम्ही म्हणाला हे कसं शक्य आहे. तर रेल्वेकडून लॉयल्टी प्रोग्राम सुरू कऱण्यत येणार आहे. त्या अंतर्गत या सुविधा मिळणार आहे. लॉयल्टी प्रोग्रामचा मुख्य उद्देश नियमित प्रवाशांना बक्षीस देणे आणि पर्यावरणपूरक प्रवास करण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेकजण रेल्वेचा प्रवास सोडून विमानाने जात आहेत. त्या सर्व प्रवाशांना टिकवून ठेवण्यासाठी रेल्वेकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.

रेल्वेच्या लॉयल्टी प्रोग्राम अंतर्गत, नियमीत प्रवाशांना प्रति किलोमीटर रिवॉर्ड पॉइंट दिले जातात. प्रवाशी हे रिवॉर्ड पॉइंट नाश्ता, जेवणापासून ते रेल्वेच्या तिकिटासाठी वापरू शकतात. रेल्वे बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसी पोर्टल डिजिटल वॉलेटसारखे अपडेट केले जाईल. त्यावर प्रवासाचे जितके अंतर जास्त असेल तितके पॉइंट मिळतील. हे पॉइंट प्रवासी रोख रक्कमेप्रमाणे वापरू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, लॉयल्टी प्रोग्राम योजना एप्रिलपासून वंदे भारत आणि तेजस एक्सप्रेस या प्रिमियम गाड्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाऊ शकते.

लॉयल्टी प्रोग्राम हा जगातील सर्वात मोठा प्रोग्राम असेल असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे. यामध्ये ७ हजारहून अधिक रेल्वे स्थानकं आणि साडेतीन हजार किमी अंतर कापणाऱ्या रेल्वेंचा समावेश असेल. या प्रवासामधून अनेक रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. त्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे रेल्वे प्रवाशांना तिकिटे बुक करताना मूळ भाड्यावर सूट मिळेल. किंवा त्यांच्या रिवॉर्ड पॉइंट्सच्या आधारे मोफत तिकीट मिळेल. त्याशिवाय प्रवासा दरम्यान रेल्वे स्थानकाच्या लग्जरी लाउंजमध्ये मोफत जेवणाचा आनंद घेता येईल. ई-केटरिंगद्वारे ट्रेनमध्येही मोफत जेवण आणि नाश्ता घेता येईलच. त्याशिवाय तिकिट थर्ड एसी वरून सेकंड एसी आणि सेकंड एसी वरून फर्स्ट एसीमध्ये अपग्रेड करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banan Benefits: सकाळी रिकाम्या पोटी केळी खावी की नाही? जाणून घ्या हे ७ फायदे आणि परिणाम

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT