

आठव्या वेतन आयोगाच्या कामाला सुरुवात होऊन आता ९ महिने उलटले आहेत. आयोगाकडे अहवाल तयार करण्यासाठी आणखी ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांना वेग आलेला आहे.
दर तीन महिन्यांनी DA वाढवण्याची मागणी
सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) दिली जाते. पण महागाईचा वाढता दबाव लक्षात घेता दर तीन महिन्यांनी DA मध्ये बदल किंवा वाढ करावी, अशी मागणी भारत पेंशनर्स समाजाने केली आहे.
२५% DA बेसिकमध्ये मर्ज करण्याची मागणी
DA २५ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर तो बेसिक पेन्शन किंवा बेसिक पगारात मर्ज करण्याची व्यवस्था असावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या महागाईनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन सुधारायला मदत होऊ शकते.
फिटमेंट फॅक्टर ३.८३ करण्याची मागणी
संघटनेने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. हा प्रस्ताव स्वीकारला गेल्यावर बेसिक सॅलरीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
फॅमिली युनिट वाढवण्याची मागणी
सध्या फॅमिली युनिटची मर्यादा ३ आहे. ती ५.२ पर्यंत वाढवावी, तसेच आई-वडिलांचाही त्यात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आठवा वेतन आयोगाची स्थापना ही ३ नोव्हेंबर २०२५ रोजी झाली होती. तर आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.